‘श्रृंगार करून बसा आणि नवर्‍यांना त्रास देऊ नका’ ! ‘या’ सरकारनं ‘वर्क फ्रॉम होम’ करणार्‍या महिलांना सांगितलं

क्वालालंपूर  :  वृत्तसंस्था  –  कोरोना विषाणूमुळे जगभरातील अनेक देश आजकाल त्रस्त आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होऊ नये म्हणून सर्व खासगी आणि सरकारी नोकरीत काम करणारे लोक स्वतःच्या घरातून काम करत आहेत. काही देशांमध्ये वर्क फ्रॉम होमचे दुष्परिणामही समोर आले आहेत.

चीनमध्ये वुहान आणि हुबेई प्रांतांमध्ये सरकारने लॉकडाउन केले तेव्हा घटस्फोटाच्या घटनेत या दोन प्रांतांमध्ये वाढ झाली आहे, सर्वसाधारण दिवसात जिथे घटस्फोटाची केवळ ५ ते ७ प्रकरणे दाखल होत होती तेच लॉक डाऊन कालावधीत त्यांची संख्या चार पट झाली. दोन महिन्यांत 36 ते 40 दरम्यान जोडप्यांनी घटस्फोटासाठी प्रकरणे दाखल केली आहेत .

काय आहे सल्ला

आता मलेशियामध्येही कोरोना विषाणूचे रुग्ण सापडले आहेत, हे लक्षात घेता मलेशिया सरकारने सर्व खाजगी आणि सरकारी कर्मचार्‍यांनाही घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. घरून काम करत असताना, मलेशिया सरकारने एक विशेष प्रकारचा सल्ला जारी केला आहे, यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.

सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून, सरकारने सल्ला दिला आहे की ज्या महिला घराबाहेर काम करतात त्यांनीही घरी काम केले पाहिजे, मेक-अप करावे आणि पतींना त्रास देऊ नये. यासाठी हॅशटॅगसह #WomenPreventCOVID19 पोस्टर देखील जारी करण्यात आले आहेत.

काय आहे पोस्टर

#WomenPreventCOVID19 ने जारी केलेल्या पोस्टर्स मध्ये सोफ्यावर बसलेला एक पुरुष महिलेला सांगत आहे की ,घरकामात मदत हवी असेल तर

‘व्यंगात्मक ‘ होणे बंद करा. जेव्हा सरकारकडून हे पोस्टर जारी करण्यात आले तेव्हापासून सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. केवळ मलेशियातच नव्हे तर इतर देशात देखील लिंगभेद करणारे सरकार म्हणून टीका करण्यात येत आहे.

सोशल मीडियाची घेतली मदत

असा संदेश देण्यासाठी सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर डिजिटल पोस्टर्सचा वापर केला आहे. ही पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल आहेत, त्यानंतर सरकार टीकेचा बळी पडले आहे. दुसरीकडे, जगातील अनेक महिला हक्क गटांनी आधीच चिंता व्यक्त केली आहे की लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचारात बळी पडलेल्या बर्‍याच महिलांना त्यांच्या आक्रमक पार्टनर सोबत एकाच छताखाली राहायला भाग पाडले गेले आहे, त्या स्त्रिया निराश आहेत कारण कोणताही सल्ला किंवा सूचना त्यांच्यासाठी का दिल्या नाहीत.

दुसरीकडे मंत्रालयाने असा सल्ला दिला आहे की जर त्यांना घरातील कामे करायची असतील तर , पत्नींनी आपल्या पतींसोबत हसत खेळत राहिले पाहिजे किंवा डोरेमॉन सारख्या कार्टून सारखे निर्दोष आवाजात बोलणे आवश्यक आहे या पोस्टर सिरीजमध्ये घरातून काम करणाऱ्या महिलांनी नेहमी सजून धजून काम करावे असे देखील म्हंटले आहे.

महिला म्हणाल्या अनावश्यक सल्ला

महिलांनी अनावश्यक सल्ल्याबद्दल टीका केली आहे. त्या म्हणतात की लॉकडाऊनच्या वेळी प्रत्येक मनुष्याने स्वत: ची काळजी घेणे, स्वच्छ आणि चांगली दिनचर्या राखणे महत्वाचे आहे. सरकारने विशेषत: स्त्रियांना ध्यानात ठेवून असा सल्ला देऊ नये, जेव्हा अशा परिस्थितीत स्त्री-पुरुष दोघांमध्ये समानतेची चर्चा असते. स्त्रियांना सजून धजूनच काम करण्याचा दिलेला सल्ला ठीक नाही .