महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांनी ‘कॉंग्रेस व राष्ट्रवादी’ला पाठिंबा द्यावा : शिवराज पाटील

पोलीसनामा ऑनलाईन – आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस झाले आहे तरी देखील सत्ता स्थापनेला अजूनही मुहूर्त लागला नाही. महायुतीला बहुमत मिळूनही भाजप-शिवसेनामध्ये सत्तावाटपावरुन वाद सुरु झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी व अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न संपवण्यासाठी शुक्रवारी ‘अन्य पक्षांनी’ कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकच मार्ग आहे. इतर लोकांनी (पक्षांनी) कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगायला पाहिजे की ते सरकार स्थापनेत पाठिंबा देतील. ‘जर अश्या व्यवस्थरेवर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली तर, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकते. ‘पाटील यांनी इतर पक्षांना पाठिंबा देण्याचे सांगितले असले तरी त्यांचा हा इशारा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला असू शकतो.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, ‘राष्ट्रपती राजवटीकडे महाराष्ट्र्राची वाटचाल सुरु आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर एका महिन्यात सर्व गोष्टी सामान्य होतील. सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्याला माघार घ्यावीच लागेल.’ माजी उपमुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ‘wait and watch’ ची भूमिका घेतील.

 

Visit : Policenama.com