वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कपिल देवची क्रिकेटनंतर ‘गोल्फ’मध्ये कमाल, जिंकली मोठी ‘ट्रॉफी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी गोल्फ जगतात देखील आपला बोलबाला सुरु ठेवला आहे. 1983 साली भारतीय संघाला जागतिक विजेतेपद मिळवून देणाऱ्या या कर्णधाराने  एवीटी चॅम्पियन्स टूर या गोल्फमधील स्पर्धत विजेतेपद आपल्या नावे केले आहे. 60 ते 64 वर्ष वयोगटाच्या या स्पर्धत त्यांनी हे विजेतेपद आपल्या नावे केले. तर राष्ट्रीय सीमा सुरक्षा दलाच्या पुष्पेंद्र सिंह राठौड यांनी ओवरऑल विजेतेपद मिळवले आहे.

10 शहरांमधील 100 गोल्फ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विजेतेपद मिळवल्यानंतर बोलताना कपिल देव म्हणाले कि, जिंकणे हे नेहमीच चांगले आहे. हि एक शानदार स्पर्धा असून जेष्ठ खेळाडूंना देखील यामुळे प्रेरणा मिळत आहे.

कोलकात्यात पार पडणार चौथी फेरी

या स्पर्धेची पहिली फेरी दिल्ली-एनसीआरमध्ये मार्च महिन्यात खेळली गेली होती. त्यानंतर दुसरी फेरी बंगळुरूमध्ये खेळली गेली होती. तर आता अंतिम फेरी हि जानेवारी 2020 मध्ये कोलकात्यात खेळवली जाणार आहे.

भारतासाठी  225  एकदिवसीय सामने आणि  131 कसोटी सामने खेळणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने 1983 मध्ये भारताला पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर आता भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या निवडीत देखील त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली  होती.

visit : Policenama.com 

Loading...
You might also like