Corona Vaccine : ऑक्सफर्डची कोरोनावरील लस 150 रुपयात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या मार्चपर्यंत भारतात केवळ दीडशे रुपयात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होणार आहे. ही लस 70 वर्षांवरील वृद्धांना कोरोना होण्यापासून ९९% संरक्षण देणार आहे. अशी माहिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील वरिष्ठ संशोधक मायणीचे सुपुत्र डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये संशोधित झालेली आणि एस्ट्रा झेनिका या कंपनीच्या साह्याने विकसित केलेली कोरोना व्हायरस लस पहिला अर्धा डोस दिल्यानंतर 70 टक्के परिणामकारक आहे. २१ दिवसांनंतर दुसरा पूर्ण डोस दिल्यानंतर ९० टक्के परिणामकारकता आहे. एस्ट्रा झेनिका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 23 हजार निरोगी लोकांवर चाचणी केल्यानंतर संयुक्तपणे अधिकृत परिणामांची जाहीर घोषणा केली. फायझर या कंपनीची ९० टक्के परिणामकारकता आहे. तर मॉडेर्ना कंपनीच्या लसीचा ९५ टक्के परिणामकारकता असल्याचं याआधीच जाहीर झालं आहे.

ऑक्सफर्डची लस ही एका विषाणू पासून बनवलेली बनवली आहे. सामान्य सर्दीच्या विषाणूची (एडेनो व्हायरस) कुमकुवत आवृत्ती असून अनुवांशिकरित्या बदली केली आहे. जेणेकरून मनुष्याच्या शरीरात त्याची वाढ होणे अशक्य आहे. तसेच शरीरामध्ये त्याचे इतर दुष्परिणाम सुद्धा होत नाहीत. फायझर आणि माॅडेर्ना एमआरएनएसारखेच ऑक्सफर्डची लस सुरुवातीला अर्धा डोस आणि २१ दिवसांत पूर्ण डोस ( बूस्टर डोस) दिल्यानंतर व्हायरसचे संक्रमण करतं.

ऑक्सफर्ड लस आणि इतर लस
– फायझर या कंपनीची लशी ७० अंश सेल्सिअस तापमानाला स्टोअर करावी लागते.
– मोडेना कंपनी ची लस देऊन अंश सेल्सिअस स्थापना स्टोअर करावी लागते.
– ऑक्सफर्डची लस मात्र धन दोन ते आठ अंश सेल्सिअस (घरातील रेफ्रिजरेटर मधील तापमानाला ही स्टोअर करता येते)
– फायझर कंपनीचा लसीच्या डोस ची किंमत सुमारे अडीच हजार (३५ डॉलर)
– मोडेना कंपनीच्या एका लसीची किंमत सुमारे दोन हजार ७०० रुपये (३७ डॉलर)
– ऑक्सफर्डच्या एका डोस ची किंमत केवळ दीडशे रुपये (२ डॉलर)

मार्च महिन्यापर्यंत भारतामध्ये ऑक्सफर्ड फायझर आणि मोडेनासह अन्य दोन तीन कंपन्यांच्या लसी उपलब्ध होतील. भारतामध्ये विकास होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीचे परिणाम अजून जाहीर झालेले नाहीत. २०२१ चा डिसेंबर महिन्यापर्यंत ऑक्सफर्डच्या लसीचे तीनशे कोटी डोस दिले जातील. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ना नफा ना तोटा नियमानुसार ऑक्सफर्ड लस सर्व कंपन्या यूरोपमध्ये आणि सिरम इन्स्टिट्यूट भारतामध्ये तसेच इतर देशांत कमीत कमी किमतीत उपलब्ध करून द्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑक्सफर्डची लस ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना कोरोना होण्यापासून ९९ % संरक्षण देते.

कोणती लस कोणी विकसित केली.?
– ऑक्सफर्डची लस सारा गिल्बर्ट आणि अँडू पोलार्ड या शास्त्रज्ञांनी मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये विकसित केली.
– फायझर कंपनीची लस जर्मनीमध्ये उगर शाहीन आणि त्यांच्या पत्नी झलेम तुरेस यांनी युनिव्हर्सिटीमध्ये ऑफ मनीझ बायोटेक मध्ये विकसित केली.
– मोडेना कंपनी ची लसअमेरिकेतीलमॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये विकसित केले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, पुढच्या टप्प्यात आणखीन ६० हजार व्यक्तींसह कॅन्सर, डायबिटीज, हृदयरोग, काविळ आदि विविध आजार असणाऱ्या रुग्णांवर चाचणी करून लसीची परिणामकारकता तपासली जाणार आहे. त्यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, केनिया देशांचा समावेश आहे. सध्या जगातील दहा देशांमध्ये ऑक्सफर्डच्या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. लवकरच युनिव्हर्सिटी एस्ट्रा झेनिका मिळून तिसऱ्या टप्प्यातील प्रभावी माहिती बिटन सरकारच्या त्याचबरोबर इतर देशातील मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या कंपन्या त्या त्या देशातील सरकारच्या सुरक्षा नियामक एजन्सीकडे प्रस्तुत करतील

ऑक्सफर्डची लस फेब्रुवारी २०२० मध्ये विकसित करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यातील (फेज-१) चाचणी एप्रिल २०२० पासून सुरू होईल. सध्या जगभरात २५ पेक्षा अधिक देशांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील (फेज-३) चाचणी सुरू होईल सुरू आहे.
– डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ संशोधक, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी