तिहार जेलमध्ये बंद असलेल्या चिदंबरम यांचा मुलगा कार्तिचं पत्र, US ओपनची केली आठवण

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी त्यांना पत्र लिहिले असून त्यात अनेक विषयांवर मत व्यक्त करून मोदी सरकारवर टीका केली आहे.

पत्राच्या सुरूवातीला कार्ती चिदंबरम यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस आणि पंतप्रधान मोदींच्या ’56 इंच छातीवर विषयी भाष्य केले आहे. तसेच इस्रोच्या चांद्रयान 2 च्या लँडिंगचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी इस्त्रोच्या प्रमुखांना मिठी मारली हे त्यांचे कृत्य नाटकी असल्याचे ते म्हणाले आहेत. अलीकडेच पियुष गोयल यांनी गुरुत्वाकर्षणाच्या शोधाचा संदर्भ देताना अल्बर्ट आइनस्टाइनचे नाव घेतले होते. पियुष गोयल यांच्या आईन्स्टाईन यांच्या विधानावरही त्यांनी पत्रात टीका केली आहे .

आर्थिक मंदी आणि काश्मीर प्रश्नाबाबतही कार्ती चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जीडीपी वाढ 5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याबाबत त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लक्ष्य केले. याखेरीज त्यांनी पत्रात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) वर टीका केली. तसेच पत्रात कार्ती चिदंबरम यांनी काश्मीरवरून मोदी सरकारवरही हल्ला केला आहे. याचबरोबर त्यांनी  आपल्या पत्रात रफेल नदालच्या यूएस ओपन फायनलमध्ये रशियन खेळाडू डॅनी मेदवेदेवला पराभूत करण्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्याने म्हटले आहे की विजयानंतर नदालने ज्या प्रकारे प्रतिस्पर्धी खेळाडूशी हातमिळवणी केली, ते त्यांच्या सभ्यतेला सूचित करते.

चिदंबरम यांची आत्मसमर्पण याचिका फेटाळली-

ईडीसमोर आत्मसमर्पण करण्याची चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात रहावं लागणार आहे.