चीनमध्ये ‘कोरोना’ व्हायरसनं ‘थैमान’ घातल्यानं का आनंदी होत आहेत पाकिस्तानी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. चीनसोबतच आता हा धोकादायक विषाणू जगातील बर्‍याच देशांमध्ये पसरला आहे. आतपर्यंत चीनमध्ये या व्हायरसमुळे जवळपास 490 लोकांचा मृत्यू झाला असून दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ त्याच्या उत्पत्ती आणि उपचारांबद्दल संशोधन करीत आहेत जेणेकरून त्याचा होणार प्रसार रोखता येईल.

दरम्यान, पाकिस्तानमधील काही लोक चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास त्यांच्या कर्माची शिक्षा असल्याचे म्हणत आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील या व्हायरसमुळे चीनविषयी मीम्स शेअर केल्या जात आहेत. पाकिस्तानमधील बरेच लोक चीनमधील मुस्लिमांच्या गैरवर्तनाची जोड देऊन पाहत आहेत. सोशल मीडियावर असे मिम्स शेअर केले जात आहेत की, प्रथम चीनने मुस्लिम महिलांचा मुखवटा जबरदस्तीने काढून टाकला आहे आणि आता चिनी लोकांना स्वत: हा मुखवटा (मास्क) लावून फिरण्यास भाग पडले आहे. काही पाकिस्तानी वापरकर्त्यांनी म्हटले की, कोरोना चीनसाठी ‘आजाब’ (शिक्षा) आहे. दरम्यान, सर्व पाकिस्तानीही याचा विरोध करीत आहेत आणि चीनच्या जनतेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करीत आहेत. सर्व पाकिस्तानी नागरिकांसह सेलिब्रिटींनीदेखील ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

याबाबत पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी यांनी ट्विट करत लोकांना ‘अल्लाहच्या दीनची थट्टा करणे थांबवा’ असे आवाहन केले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “या जगात अजाब फक्त रसूलवर विश्वास नसलेल्यांवर येते.” ते पुढे म्हणाले, उर्वरित लोकांचा निकाल न्यायाच्या दिवशी असेल. विषाणूचा प्रसार झाला असो वा भूकंप, ही सर्व चिन्हे प्रत्येकाला मृत्यूच्या सत्याची आठवण करून देतात. म्हणून सहानुभूती दाखवा. अल्लाह सर्वांचे रक्षण करो. तसेच दुसर्‍या ट्वीटमध्ये त्याने म्हंटले की, जे अशा घटनांना अजाब म्हणत आहेत त्यांनी हे करणे थांबवावे. अल्लाहच्या दिनची चेष्टा करू नका त्याऐवजी तुम्हाला मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते करा. या विषाणूमुळे ग्रस्त झालेल्यांसाठी प्रार्थना करा. दरम्यान, चीनी सरकार मुस्लिमांवर अत्याचार करीत आहे. चीन इस्लामच्या अनुयायांना प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली डिटेन्शन सेंटरवर पाठवत आहे. इथे नमाज पठन आणि दाढी करण्यावरही अनेक निर्बंध आहेत. चीनशी असलेल्या मैत्रीमुळे पाकिस्तान सरकार यावर गप्प आहे, परंतु सर्वसामान्यांना याचा संताप आहे.