Teacher Suspended for Having Sexy-Figure : खरंच लाहोरमध्ये शिक्षीका आसिया जुबेरला सेक्स-फिगर असल्यामुळं निलंबीत केलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रेंडिंग हॅशटॅग हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा एक भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर #TooSexyToWorkSoFire हे हॅशटॅग खूप प्रसिद्ध झाले आहे. काही लोक हॅशटॅगसह आसिया जुबैर नावाच्या लाहोरच्या शिक्षकेच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत, तिला तिच्या दिसण्यामुळे शालेय शिक्षकेची नोकरी सोडायला सांगण्यात आले होते.

रिपब्लिक ऑफ बझच्या माध्यमातून ही बातमी प्रकाशित झाली होती, ज्याचे शीर्षक होते “Teacher suspended for having ‘sexy-figure’: Lahore.” या व्हायरल बातमीत पांढऱ्या सलवार कमीजमधील एका मुलीचा फोटोही आहे. फोटोत एक स्क्रीनशॉट देखील आहे. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, अतिशय तंदुरुस्त आणि मादक असल्याने महिला शिक्षकेस शाळेतून एटर्मिनेशन पत्र देण्यात आले.

ट्विटरवर युजर्स आता #TooSexyToWorkSoFired हॅशटॅगसह या बातमीला शेअर करत आहेत आणि महिला शिक्षकेसाठी पाठिंबा दर्शवत आहेत. याच दरम्यान लोक निलंबित शिक्षिका आसिया जुबेरला देखील सर्च करत आहेत. असिया जुबेर लाहोर, आशिया जुबेर पाकिस्तान, आशिया जुबेर लाहोर पिक्स, आशिया जुबेर न्यूज, असिया जुबेर ट्वीट, असिया जुबेर इंस्टाग्राम अकाउंट, टीचर सस्पेंड फॉर सेक्सी फिगर इन लाहोर, टीचर सस्पेंड लाहोर न्यूज, टीचर सस्पेंड फॉर बीइंग फिट इन लाहोर असे बरेच ऑनलाईन सर्च केले जात आहेत.

ट्विटर युजर @AasiaZubair908 ने १९ ऑगस्ट २०२० रोजी या बातमीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ‘लाहोरमधील शिक्षकेला ‘सेक्सी फिगर’मुळे निलंबित केले गेले.’ @ AasiaZubair908 ने #TooSexyToWorkSoFired व्हायरल ट्विटमध्ये प्रश्न विचारत लिहिले की, माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या शालेय अधिकाऱ्यांनी ‘मादक’ असल्यामुळे त्यांना कसे काढून टाकले?

https://twitter.com/Aasiazubair908/status/1296112017623801856

वृत्तानुसार, “स्थानिक शाळेच्या कारभारामुळे काही चुकीच्या कारणामुळे एका शिक्षकाने आपली नोकरी गमावली. शिक्षकाची नोकरी का गेली हे या बातमीच्या शीर्षकातून समजले आहे. अत्यंत आकर्षक दिसत असल्यामुळे महिलेच्या हातून तिची शिक्षकाची नोकरी गेली. वास्तविक काय घडले ते जाणून घेऊया. बातमीच्या अहवालात सांगितले गेले आहे की, महिलेचे नाव आसिया जुबेर आहे. ती ३० वर्षाची विवाहित महिला असून तिला २ मुले आहेत आणि गेल्या १२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी मंगळवारी माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ‘खूप मादक’ असल्याच्या कारणावरून महिलेला काढून टाकण्यात आले होते.”

https://twitter.com/Aasiazubair908/status/1296112017623801856

मात्र लवकरच अनेकजणांना ते फेक वाटू लागले. एका ट्विटर यूजर @DeftyDeepa ने लिहिले की, “यावर टीएल वर का दिसत आहे हे समजण्यास मला थोडा वेळ लागला”. या युजरने सांगितले की, असिया जुबेरने बातम्यांमध्ये आपले ट्विट कसे प्रसिद्ध केले होते. दरम्यान आणखी एका युजरने प्रकाशनाच्या मूळ बातम्याच्या तुकड्यात वापरलेला वास्तविक आणि फोटोशॉप फोटो शेअर केला, ज्यामुळे खळबळ उडाली.