PAK कडून सीमारेषेवर पुन्हा एकदा ‘शस्त्रसंधीचे’ उल्लंघन, 2 नागरिकांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील शहापूर आणि किर्णी सेक्टरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला भारतीय सैन्याने प्रतिउत्तर दिले.

या गोळीबारात नियंत्रण रेषेवर असलेल्या गावातील दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून मंगळवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास शहापूर व किर्णी या दोन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. पाकिस्तानकडून 182 एमएम उफळी तोफ्यांचा मारा करण्यात आल्याने सीमारेषेवरील घरांचे मोठे नुकसान झाला. भारतीय सैन्याने पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिले.

Visit : policenama.com

You might also like