पाकिस्तानच्या संसदेत मुलांचं ‘लैंगिक’ शोषण आणि हत्या करणार्‍या दोषींना भरचौकात ‘फाशी’ देण्याचा प्रस्ताव मंजूर

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – जे नराधम मुलांवर लेंगिक अत्याचार करतात , त्यांचा छळ करतात , त्यांची हत्या करतात त्यांना उघडपणे शिक्षा देण्यात यावी आणि शिक्षा फाशीची असावी यासाठी पाकिस्तानच्या संसदेने एक ठराव बहुमताने पारित केला असून हा प्रस्ताव संसदीय कामकाज राज्य मंत्री अली मुहंमद खान यांनी संसदेत मांडला हा ठराव पाकिस्तान पीपल्स पार्टी सोडून सर्व पक्षांनी बहुमताने पारित केला.

यावेळी हा ठराव योग्य नसल्याचे मत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आणि पूर्व प्रधानमंत्री रजा परवेश अशरफ यांनी मांडले . ते म्हणाले की अशी कठोर शिक्षा देऊन असे गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या कमी होणार नाही. आपण सयुंक्त राष्ट्राच्या नियमाचे उल्लंघन करून सार्वजनिकपणे फाशी देता येणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. रजा परवेश अशरफ यांनीच नव्हे तर तंत्रशिक्षण मंत्री फवाद चौधरी यांनी सुद्धा या ठरावाची निंदा केली आहे.

फवाद चौधरी यांनी ट्विट करताना सांगितले की हे पाऊल क्रूरतेचे समर्थन करणारे आहे. समाज संतुलित कार्याने चालत असतो . सार्वजनिक पणे फाशी देणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे , यावर बोलताना मानवाधिकारमंत्री शिरीन मजारी म्हणाले की , हा ठराव सरकारने मांडला नसून हा व्यक्तिगत असून , अजूनही पाकिस्तानमध्ये मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही.

पाकिस्तानच्या बाल हक्क संघटनेने मागच्या सप्टेंबरमध्ये एक अहवाल सादर केला होता त्यामध्ये ज्यानुसार जानेवारी ते जून पर्यंत १,३०४ प्रकरणे समोर आली आहेत जी मुलांच्या लैंगिक शोषणा संदर्भात आहे. पाकिस्तानात दररोज सुमारे सात मुले लैंगिक शोषणाचे बळी ठरत आहेत. असे अपराध रोखण्यासाठी बाल हक्क संघटना संबंधित कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या बाजूने कायम आवाज उठवीत असतात .