कलम 370 ! भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानने ‘व्यापारी’ संबंध तोडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय केंद्र सरकारने जम्मू काश्मिरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कलम ३७० रद्द करत केंद्र सरकारने जम्मू, काश्मिर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर भारतात आनंद व्यक्त होत असला तरी पाकिस्तानमध्ये मात्र संभ्रमतेचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर काही निर्णय घेतले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने भारतासोबत असलेले द्विपक्षीय व्यापार संबंध तोडले आहेत.

पाकिस्तानने काश्मिरबाबत घेतलेल्या भारताच्या निर्णयावर बैठक घेण्यात आली होती. तेथे पाकिस्तान आणि भारत यांच्यात असलेला द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत इतर व्यापार संबंधही तोडण्याचा निर्णय पाकिस्तानने या बैठकीत घेतला आहे. तसंच पाकिस्तान आता भारतासोबत असलेल्या द्विपक्षीय करारांचा आढावा घेणार आहे.

तसंच पाकिस्तानने हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याची धमकीही दिली आहे. तसंच पाकिस्तानने भारतासोबत असलेले राजनैतिक संबंधही डाऊनग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पाकिस्तान भारताच्या राजदूताला भारतात पाठवून देणार आहे.

दरम्यान, भारताने जम्मू काश्मिरमध्ये असलेले कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर अनेकदा पाकिस्तान व्याप्त काश्मिरही भारताचाच भाग असल्याचा दावा भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. तसंच काश्मिरमध्ये सध्या भारतीय सेनेचे अनेक जवान तैनात केले आहेत. त्यामुळे पाकिस्ताननेही सावधगिरीची भुमिका घेतली आहे.

आरोग्यविषयक वृत्त