पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांना ‘सजा-ए-मौत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परवेज मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या न्यायालयात खटला दाखल होता. या खटल्यावर आज निर्णय देण्यात आला.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. यावर आज विशेष न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पाकिस्तानचे न्यायालय आज म्हणजेच 17 डिसेंबरला परवेज मुशर्रफ यांना शिक्षा सुनावणार असे 5 डिसेंबरलाच स्पष्ट झाले होते.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दुबईत राहणाऱ्या मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारकडून दाखल याचिकेवर सुनावणी करताना एका विशेष न्यायालयाला 28 नोव्हेंबरला निर्णय देण्यावर रोखले होते. यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला विशेष न्यायालयाने 76 वर्षीय मुशर्रफ यांचा देशद्रोहाबाबत 5 डिसेंबरचा रेकॉर्ड घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आज त्यांना पाकिस्तानच्या एका विशेष न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/