पाकिस्तानच्या उरात धडकी ; सीमेवरील ४० गावांचे केले स्थलांतर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेची पाकिस्तानने धसका घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीर मधील अनेक गावांचे स्थलांतर पाकिस्तानने अन्यत्र केले आहे. त्याच बरोबर १२७ गावांना पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या आक्रमणाचा हायअलर्ट दिला आहे. पाकिस्तान भारताच्या भूमिकेने घाबरला असून भारत कधीही सर्जिकल ट्राईक साठी येऊ शकतो अशी पाकिस्तानच्या लष्कराला भीती आहे.

जैश-ए-मोहम्मदचा मोऱ्हक्या मसूद अजहरला त्याच्या दहशवादी संघटनेच्या बहावलपूर येथील मुख्यालयातून पाकिस्तानी लष्कराने अज्ञात स्थळी हलवले आहे अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. त्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मुख्यालय असलेल्या रावळपिंडी या शहरात पाठवण्यात आले आहे. तसेच त्याच्या जीविताची रक्षा करण्याची जबाबदारी आयएसआयने घेतली आहे अशी हि माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतीय लष्कराला लक्ष करण्याच्या तयारीत आहेत. जैश – ए – मोहम्मह हि दहशतवादी संघटनाचा पुन्हा एकदा भारतीय लष्करावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तर दहशतवाद्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जैश – ए – मोहम्मह पुलवामा हल्ल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्याच्या तयारीत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त देखील प्रकाशित केले आहे. तसेच पाकिस्तानने नव्या दहशतवादी हल्ल्यासाठी जैश – ए – मोहम्महला ५०० किलो आयइडी स्फोटक दिले आहे.