मोठ-मोठया गोष्टी करणारे इमरान खान ‘कोरोना’मुळं ‘रडकुंडी’ला, 3 आंतरराष्ट्रीय संस्थांकडून PAK पंतप्रधानांनी घेतलं 150 कोटी डॉलरचं कर्ज

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारताला मदत करण्याचे पोकळ वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची त्यांच्या जनतेसमोरच पोलखोल झाली आहे. अगोदरच खंगलेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था आता कोरोनाच्या संकटामुळे आणखी बिकट झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी अंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांकडे पुन्हा एकदा कर्जासाठी झोळी पसरली आहे. त्यांनी तीन अंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांसोबत 150 करोड डॉलरच्या कर्जासाठी करारावर हस्ताक्षर केले आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालयाने जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेसोबतच्या करारावर हस्ताक्षर केले आहे. रिपोर्टनुसार, आशियाई विकास बँक पाकिस्तानच्या कोविड-19 अ‍ॅक्टिव्ह रिस्पॉन्स अ‍ॅण्ड एक्सपेन्डिचर सपोर्ट प्रोग्राममध्ये 50 करोड डॉलरची मदत करत आहे.

आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक म्हणजे एआयआयबी सुद्धा याच कार्यक्रमाच्या अंतर्गत 50 करोड डॉलरची मदत करत आहे. अशाच प्रकारे 50 करोड डॉलरचा आणखी एक करार झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पुढील काही दिवसांमध्ये 150 करोड डॉलरचे हे कर्ज पाकिस्तानला मिळेल.पाकिस्तानमध्ये शनिवारी संसर्गामुळे 153 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6,604 नवी प्रकरणे समोर आली आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 3,382 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 171,665 प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत.