PAK : इम्रान सरकारने भारताकडून कापूस व साखर आयात करण्याच्या निर्णयावर घेतला ‘यू-टर्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने भारताशी व्यापारासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता, ज्यामुळे देशांतर्गत निषेध होऊ लागला आणि आता इम्रान सरकारने भारतमधून कापूस आणि साखर आयात करण्याच्या निर्णयाला पलटवले आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानात भारतातून कापूस आणि साखरेची आयात कारण्याचा मंत्रिमंडळातील आर्थिक समन्वय समितीच्या निर्णयाला खारीज करण्यात आलं आहे. भारताकडून कापसाची आयात करण्यात यावी अशी मागणी कापड उद्योगाची आहे. तर दुसरीकडे कट्टरपंथी इम्रान सरकारवर टीका करत आहे कि, ते काश्मीरप्रकरणी प्रश्न सुटला नसताना देखील ते भारतापुढे झुकले आहे.

दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानी मंत्रिमंडळाच्या निर्णयात कापूस आयात करण्याचा निर्णय थांबविण्यात आला. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील आर्थिक समन्वय समितीने बुधवारी भारताशी व्यापार पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. समितीने म्हटले की, 30 जून 2021 पासून पाकिस्तान भारताकडून कापूस आयात करेल. पाकिस्तान सरकारनेही खासगी क्षेत्राला भारत कडून साखर आयात करण्यास मान्यता दिली होती. पाकिस्तानने 2016 मध्ये कापूस व इतर कृषी उत्पादनांची आयात भारतकडून रोखली होती. माहितीनुसार पाकिस्तानमधील साखरेचे वाढते दर आणि कापड उद्योगाला संकटांपासून वाचवण्यासाठी इम्रान सरकारने भारताशी व्यापार पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली होती. दोन्ही देशांमधील ताणतणावाच्या संबंधांदरम्यान, हे भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाकिस्तानचे पहिले मोठे प्रयत्न म्हणून पाहिले गेले होते.

कापसाच्या कमतरतेसह पाकिस्तानचा संघर्ष सुरूच
कापूस नसल्यामुळे पाकिस्तानी वस्त्रोद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कच्च्या मालाची कमतरता दूर करण्यासाठी कापूस आयातीवरील बंदी हटविण्याची शिफारस केली होती. या दबावाखाली इम्रान खान सरकारने प्रथम कापसाच्या आयातीला मान्यता दिली पण जेव्हा राजकीय पक्षांनी त्यांना घेरण्यास सुरवात केली तेव्हा त्याला खारीज करण्यात आले.