हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या विमानांनी भरले होते उड्डाण… पण त्यांची झाली हवा टाईट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. आपल्यावर भारतीय हवाईदलाकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे ही बाब पाकच्या उशिरा लक्षात आली. त्यानंतर पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ ने सुरुवातीला प्रतिकात्मक हल्ला म्हणून उड्डाण केले खरे पण भारतीय वायुसेनेची भली मोठ्ठी विमानं आधीपासूनच तेथे तैनात होती. भारतीय वायुसेनेची विमानं एवढी मोठी होती की पाकच्या वैमानिकांना कळून चुकलं की त्यांच्यापुढे आपला निभाव लागणार नाही. भारतीय वायुसेनेची ही विमानं आपल्याला नेस्तनाबूत करतील हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे ही पाकिस्तानची विमानं माघारी फिरली.

१) हा हल्ला जेव्हा करण्यात आला भारतातील सामान्य जनता गाढ निद्रावस्थेत असावी. त्यावेळी भारतीय वायुसेना मात्र पाकिस्तानची झोप उडवण्याच्या तयारीत होती. सर्व प्लॅन तयार होता अत्यंत गुप्तपणे पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकसाठी वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण, ग्वाल्हेर, भटिंडा, अंबालासह २० एअर बेसेसवरुन  मिराज २००० विमानांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी उड्डाण घेतले.

२) भारतीय सैन्य दलाची शान मिराज २३०० किलोमीटर या वेगानं मिराज विमानं हल्ला करण्यासाठी तयार होती. पुढच्या तीन ते चार मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला.

३) भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा हल्ला केला आहे. भारतीय हवाई दलाने १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरुन खोलवर सर्वप्रथम कारवाई केली. ही कारवाई सुरु असतानाच पहाटे पावणे चार वाजता काही विमानांनी मुजफ्फराबाद येथील तळावर हल्ला केला. जवळपास ८ मिनिटे हा हल्ला सुरु होता. त्याचवेळी चकोटी येथे ३ वाजून ५६ मिनिटांनी हल्ला केला. भारतीय विमानांनी तब्बल ९ मिनिटे जोरदार बॉम्बफेक करुन येथील तळ उद्धस्त केले. एवढा शक्तीशाली बॉम्ब टाकल्यानंतर तेथील धुरांचे डोंगर उसळले होते.

४) दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय विमानं अवघ्या 35 ते 40 मिनिटात हल्ला करून परत आली.

५) त्यानंतर पाकिस्तान हडबडून जागे झाले. सकाळी ७ वाजल्यानंतर पाकचे लष्कर प्रमुख मेजर जनरल असीफ गफूर यांनी हल्ल्याबाबतचे ट्विट करायला सुरुवात केली. त्यानंतर या हल्ल्याचा एक व्हिडिओही पाकिस्तानने जारी केला असून त्यात मिराज विमाने हल्ला करताना दिसत आहेत.

६) अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा, जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा.

#Surgicalstrike2 : कोण आहे मसूद अजहर ?

#Surgicalstrike2 : पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराने ट्वीट केली ‘ही’ कविता