भारतीय महिलांच्या’लव्हली लेडीज’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तान्यांची ‘घुसखोरी’!

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅपने दोन देशातील लोकांना जवळ आणले आहे. काही असले तरी आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपले आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत ग्रुप असतात. त्यात अनेदा पर्सनल चॅट असतात. पण या ग्रुपमध्ये कोणी बाहेरच्या व्यक्तीने घुसखोरी केली तर?,नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. सिडको परिसरातील महिलांचा ‘लव्हली लेडीज’ म्हणून व्हॉट्सअ‍ॅपग्रुप आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला भयभीत झाल्या आहेत.

बुधवारी सकाळपासून ग्रुपमधील प्रत्येक महिलेला पर्सनल मॅसेज सुरू झाले. हे मॅसेज करणारे सर्व लोक पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. ग्रुपमध्ये हे लोक कसे आले हे कोणालाही माहीत नाही. तसंच आश्चर्य म्हणजे या ग्रुपमधल्या महिलांचा एकमेकींना फोनही लागत नाहीत. याप्रकरणी या महिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सर्व महिलांना ग्रुपमधून बाहेर पडण्याच्या सुचना दिल्या आहे.सध्या पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात कसेही आणि कोठूनही घुसखोरी करतात. पण आता या पाकिस्तानींची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्येही घुसखोरी होत आहे. तसंच घुसखोरी करत आहेत आणि त्यावर ग्रुपमधील युवक युवतींनना पाकिस्तानमधून व्हीडिओ कॉल, कॉल येत आहेत, जे भारतातील वातावरणासाठी धोकादायक आहे.

पाकिस्तानच्या अशा घुसखोरीच्या पार्श्वभूमिवर व्हॉट्सअ‍ॅप वापरताना सतर्क राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुरतालुक्यातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाकिस्तानातून अश्लिल व्हिडिओचा भडिमार सुरू झाला होता. त्यामुळे त्या ग्रुपमधील सदस्यांनी घाबरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या ग्रुपमध्ये पाकिस्तानी युवकांनी युवती असल्याचे भासवून काहींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रुप ऍडमिनला असं काही समजताच त्यांनी असे बाहेरचे नंबर ग्रुपमधून हटवले. मात्र त्यानंतरही काही युवकांना पाकिस्तानमधून व्हिडीओ कॉल येत आहेत, अशी माहिती सायबर सेलचे पीआय अशोक इंदलकर यांनी दिली.

ज्या नंबरवरून व्हीडिओ कॉल येत आहेत त्या नंबरचा पोलीस आणि सायबर सेल तपास करत आहेत. या सर्व प्रकारामागे नक्की कोणाचा हात आहे.यातून भारतीयांचा काही डेटा तर चोरला जात नाही ना याची महिती घेण्याचं काम करण्यात येत आहे. पण या सगळ्या नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याची गरज आहे, असं सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे. तसंच कोणत्याही अ‍ॅपवर आपला नंबर शेअर करण्याआधी अ‍ॅप संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा सल्लाही सायबर सेलकडून देण्यात आला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताच्या लष्करी जवानांना फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आलं होतं. त्यामुळे आपण आपले नंबर कोठेही शेअर करताना विचार करावा, तसंच नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असं सांगण्यात येत आहे.

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’