लव्ह, सेक्स अन् धोका ! पाकिस्तानी फलंदाज निघाला ‘लफडेबाज’, महिलेचे गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाईन : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) हा संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाबर हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याची तुलना सतत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी होते. पण, मैदानाबाहेरील बाबर आझमचे ‘लफडं’ समोर आले आहे. त्याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. तसेच त्याच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. पण पोलीस व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तक्रारीला भीक घालत नसल्याचा दावाही या महिलेने केला आहे. त्यामुळे बाबरच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

लाहोरमधील या महिलेचे नाव हमिझा मुख्तार असून तिने पत्रकारपरिषद घेऊन बाबरवर गंभीर आरोप केले. क्रिकेटमध्ये नाव कमवण्यापूर्वी बाबरने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले होते आणि मानसिक त्रासही दिला होता, असा आरोप तिने केला आहे. बाबर हा आपला शाळेतील मित्र असून एकाच परिसरात राहत असल्याचा दावाही तिने केला आहे. 2010 मध्ये बाबरने मला प्रपोज केले आणि 2011मध्ये कोर्ट मॅरेज करण्यासाठी आम्ही दोघे घरातून पळूनही गेले होते. दोघांच्या घरचे या लग्नाला तयार होणार नसल्याने, हे पाऊल उचलले होते. पण, बाबरने लग्न करण्यास नकार दिला. लग्नाचं खोट आश्वासन देऊन त्याने दहा वर्ष माझ्याशी संबंध ठेवल्याचा आरोपही तिने केला आहे. हमिझा ब्यूटी सलोन चालवायची आणि बाबरला आर्थिक मदतही केल्याचे तिने सांगितले आहे. या दहा वर्षांत बाबरने माझ्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आणि त्यापैकी एकही कवडी परत केली नाही. बाबरला क्रिकेटर बनवण्यासाठी आर्थिक मदत करून मी मोठा वाटा उचलला, असेही तिने सांगितले आहे.

आता त्यांना एकही चूक थेट न्यूझीलंडमधून हद्दपार करू शकते
53 जणांचा चमू घेऊन किवी देशात दाखल झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंपैकी 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यात 14 दिवसांच्या आयसोलेशनमध्येही पाकिस्तानी खेळाडू नियम मोडत असल्याचे CCTV फुटेजमधून समोर आले आणि त्यामुळे न्यूझीलंड सरकारने त्यांना फायनल वॉर्निंग दिली आहे. आता एकही चूक त्यांना थेट न्यूझीलंडमधून हद्दपार करू शकते.

You might also like