Palkhi Mahamarg | पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत; खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Mahamarg | बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) जाणाऱ्या हडपसर ते लोणंद (Hadapsar To Lonand Palkhi Marg) या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी (Hadapsar To Zendewadi Palkhi Marg) या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विटद्वारे केली आहे. (Palkhi Mahamarg)

 

दिवे घाटातून (Dive Ghat) जाणारा हा मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने वन विभागाच्या (Forest Department) परवानगीची अडचण होती. परंतु खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मध्यस्थीने हा विषय मार्गी लागला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Palkhi Mahamarg)

 

 

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे (Pandharpur Wari) पायी जाणारा पालखी सोहळा लवकरच सुरु होत असून वारकऱ्यांच्या व नागरीकांच्या सुविधा लक्षात घेता हा मार्ग पुर्ण होणे गरजेचे आहे.
याबाबतच्या सर्व अडचणी दूर झालेल्या असून हे काम तातडीने सुरु करण्याची नितांत गरज आहे.
त्यामुळे नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title :- Palkhi Mahamarg | Order for early tender of Hadapsar to Zendewadi route on Palkhi Highway; Demand of MP Supriya Sule to Nitin Gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान