15 दिवसांच्या ‘मैत्री’नं आयुष्यभरासाठी दिल्या ‘वेदना’, विद्यार्थीनीवर ‘गँगरेप’ करून ‘अर्धनग्न’ अवस्थेत फेकलं

पानिपत : वृत्तसंस्था – इंस्ट्राग्रामवर मैत्री करणे एका 14 वर्षीय मुलीला चांगलेच महागात पडले आहे. या मुलीला दोन तरुणांनी फ्रुटीमधून मद्य पाजून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित मुलीला अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. हा प्रकार शुक्रवारी (दि.24) सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडला.

पीडित मुलीची आणि तरुणाची ओळख इंस्ट्राग्रामवर झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मैत्री झाल्यानंतर दोन नराधमांनी तिला मॉडेल टाऊन येथील डीएव्ही पार्कजवळ भेटण्यास बोलावून घेतले मुलगी त्याठिकाणी पोहचताच तिला एका कारमध्ये बसवले. कारमध्ये बसवल्यावर तिला फ्रुटीमधून मद्य पाजले. त्यानंतर जवळपास तीन तास तिला कारमधून फिरवले. एका कालव्याजवळ कार थांबवून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. हे कृत्य केल्यानंतर मुलीला डीएव्ही पार्कजवळ अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. मात्र, हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्या नराधमांना पकडले.

नागरिकांनी पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशीरा मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. पोलिसांनी नागरिकांनी पकडून दिलेल्या तरुणाकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे आशीष सेखू चौहान (वय-19) आणि वीशू संदीप (वय-20) असे सांगितले. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

15 दिवसांची मैत्रीने आयुष्याला दिली वेदना
पीडित मुलगी अकरावीची विद्यार्थीनी आहे. नराधमांची आणि तिची ओळख इंस्ट्राग्रामवर 15 दिवसांपूर्वी झाली होती. आशीषसोबत तिची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. काही दिवस दोघांमध्ये चँटिंग सुरु होते. यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर शेअर केले. मैत्रीचा फायदा घेत आशिषने आपला मित्र वीशूच्या मदतीने मुलीवर गँगरेप केला. पंधरा दिवसाच्या मैत्रीने पीडित मुलीला मात्र आयुष्यभराची वेदना दिली आहे.

ट्यूशनला न जाता आरोपीला भेटायला गेली
आरोपी आशिषने तिला डीएव्ही पार्कजवळ भेटायला बोलवत होता. शुक्रवारी त्याने तिला डिएव्ही पार्कजवळ भेटायला बोलावले. मुलगी ट्युशनला न जाता ती स्कूटी घेऊन आशिषने बोलावले त्या ठिकाणी गेली. ती येण्याआधीच नराधम कार घेऊन पोहचले होते. तिला तिची स्कूटी पार्कींगबाहेर पार्क करण्यास सांगून कारमध्ये बसवले. तिला फ्रूटीमधून मद्य पाजून कारमधून फिरवले. ती बेशूद्ध झाल्यावर तिच्यावर एका कालव्याजवळ कार थांबवून कारमध्येच सामूहिक बलात्कार केला.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like