धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते : पंकजा मुंडे

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे सेटिंग आणि तोडपाणी करणारे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. परभणीचे युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी जिंतूर येथील सभेत त्यांनी ही टीका केली.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. ते आणि त्यांचे आमदारही तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेचे वारस होऊ शकत नाहीत असा घणाघात त्यांनी केला.

पंकजा मुंडे यांनी यावेळी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीने अनेक घरात भांडण लावण्याचे काम केले आहे. आमचे उदाहरण तर जगजाहीर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेत्यांची चमचेगिरी करतात, मुंडे घरात ते घराणेशाही बाबत बोलतात पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Loading...
You might also like