पंकजा मुंडेंना ‘कॅबिनेट’ मंत्रिपद मिळणार ! बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात जोरदार चर्चा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यांना पराभूत कर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे जायंट किलर ठरले आहेत. पराभवानंतर देखील पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळणार आहे, अशा हालचाली भाजपाच्या गोटामध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी दिलेले भाजपसाठी योगदान आणि पंकजा मुंडे यांनी पक्षासाठी केलेलं काम यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद दिल जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना पहिल्या टप्प्यातच मंत्रिपद दिले जाईल असे देखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

परळी विधानसभा मतदार संघातून कोण बाजी मारतं याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष होतं. धनंजय मुंडेंनी ही जागा मिळवली. त्यांनी 30 हजाराहून अधिक मतांनी पंकजा मुुंडे यांचा पराभव केला. परळीतून पंकजा मुंडे यांचा पराभव होणं हा पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाला देखील मोठा धक्का आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्हयात पंकजा मुंडे यांची मास लीडर अशी ओळख आहे. एवढेच नव्हे तर पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा गट राज्यात आहेत.

पुणे, अहमदनगर, बुलढाणा, नाशिक आणि मराठवाड्यात त्यांचे लाखो समर्थक आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासह 2 नवनिर्वाचित आमदारांनी राजीनामा देण्याची देखील तयारी दर्शवली आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर देखील पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यासंदर्भात हालचाली चालू असल्याचं सुत्रांनी सांगितलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांचा निश्चितपणे राज्य मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्याच टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात आहे.

Visit : Policenama.com