पक्षावर नाराज आहात का ? पंकजा मुंडे म्हणाल्या – ‘आणखी एक दिवस थांबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त परळीमध्ये पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभेच्या निकालानंतर पंकजा मुंडे या पक्ष बदलणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे याबाबत माध्यमांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारले असता, “इतके दिवस थांबला आहात आणखी एक दिवस थांबा”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर मुंडे समर्थकांनी ‘आमचं ठरलय’ या मोहिमेला सुरुवात केल्याने मोठी संभ्रमावस्था तयार झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यातच पंकजा मुंडे यांची भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेतल्याने एक वेगळीच चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी खडसे जेवणाच्या वेळी आले होते. आम्ही सोबत जेवण केले कौटुंबिक चर्चा झाली आणि मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे सांगितले. तसेच हा कार्यक्रम वेगळा आहे, त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही. इतक्या दिवस गोपीनाथ गडावर येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी उद्या सुद्धा गडावर यावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Visit : policenama.com