Assembly Speaker Election | अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या आक्षेपांना न जुमानता विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (Assembly Speaker Election) घेण्याची रणनीती आखणाऱ्या काँग्रेसला (Congress) तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या झालेल्या चर्चेनंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत (Assembly Speaker Election) राज्यपालांच्या विरोधात न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) वादात सध्या तरी राज्यपालांचं पारडं जड आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष निवडणूक (Assembly Speaker Election) संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कायदेशीर बाबी तपासून चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला असल्याचं समजतंय.

राज्यपलांची संमती नसली तरी निवडणूक घेण्याच्या हालचालींवरुन कायदेतज्ज्ञांनी (Legal Experts) ठाकरे सरकारचे (Thackeray Government) कान टोचले. अशा पद्धतीने निवडणूक योग्य ठरणार नसल्याचा सल्ला सरकारला दिला. त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. विधानसभेच्या आज जाहीर शेवटच्या दिवसाच्या वेळापत्रकात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नव्हता. तरी सरकार अचानकपणे निवडणूक घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु तसे काहीच घडले नाही.

राज्यपालांना बाजूला करुन निवडणूक घेण्याची तयारी दाखवून काँग्रेस नेत्यांनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला.
त्यानंतर मात्र, राज्यपालांच्या परवानगीला डावलून अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही.
तसे पाऊल न उचलण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, विरोधी पक्षांनीच (Opposition Parties) राज्यपालांचे कान भरल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून 12 आमदारांचे निलंबन (12 MLA Suspend) मागे घेण्याबाबत भाजप (BJP) नेत्यांनी सकराकडे प्रयत्न केले. तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. मात्र, या आमदारांना पुन्हा सभागृहात घेण्याची तयारी सरकारने दाखवली नाही.
यातून राज्यपालांनी ठाकरे सरकारचा निवडणूक घेण्याचा प्रस्ताव एकप्रकारे धुडकावल्या चे सांगण्यात येत आहे.

Web Title : pankhuri-shrivastava | pankhuri shrivastava who died at 32 spoke of evaluating candidates in last social media post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर