मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी ईडीने परमबीर सिंह (Parambir Singh) यांना 3 डिसेंबर रोजी तीन समन्स बजावले होते.
अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी अटकेपूर्वी ईडीने त्यांना पाच वेळा समन्स पाठवले होते. पण त्यांनी याला दाद दिली नव्हती. अखेर 2 नोव्हेंबर रोजी ते ईडीसमोर हजर झाले. त्यांची चौकशी केल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अटक (Arrest) करण्यात आली.
100 कोटी रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं आणि सीबीआयनं (CBI) गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही तपास यंत्रणांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. ईडीने नुकतीच देशमुख यांच्या स्वीय सचिवाला अटक केली होती.
तसेच अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांना समन्स पाठवलं होतं.
परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की,
अनिल देशमुख यांच्याकडून माजी एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze) आणि इतरांमार्फत महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणी उकळली जात होती.
Web Title :- Parambir Singh | ed records statement of former mumbi cp parambir singh in money laundering case of former home minister anil deshmukh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 81 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी