Parambir Singh | परमबीर सिंग यांना ‘फरार’ घोषित करण्याची शक्यता; पगार थांबवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटर बाॅम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. यानंतर परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून परमबीर यांचा थांगपत्ता लागेना. मुंबई पोलिसांनी अनेकवेळा त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, परमबीर सिंग हजर झाले नाहीत. यानंतर त्यांना फरार (Absconding) घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे.

 

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. अनेक चर्चेला उधाण आलं. दरम्यान. मागील दिवसापांसून परमबीर हे बेपत्ता आहेत. त्यामुळे परमबीर सिंग (Parambir Singh) यांचा पगार थांबवण्याचा निर्णय राज्य सराकारने घेतला आहे. तसेच, त्यांना फरार घोषित करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे.

 

मागील महिन्याभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारलाही सापडत नसलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा अखेर ठावठिकाणा लागल्याची चर्चा समोर आली आहे. परमबीर हे सध्या चंदीगडमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परमबीर यांनी चौकशी आयोगापुढं एक प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्याला जोडलेली पॉवर ऑफ अॅटर्नी ही चंदीगड शहरात तयार करण्यात आली असल्याचं पुढं आलं आहे.

 

Web Title :- Parambir Singh | mumbai former cp parambir singh salary to be stopped by maharashtra government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा