Parambir Singh | परमबीर सिंह यांचे गंभीर आरोप, म्हणाले – ‘सचिन वाझेला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी 3 मंत्र्यांचा होता दबाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai CP) परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) पुन्हा मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाब इडीला (ED) दिला आहे. यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी स्पष्ट सूचना दिली होती, असा जबाब परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी ईडीला दिला आहे. तसेच पोलिस बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) स्वत: घेऊन येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात (Chargesheet) ही माहिती समोर आली आहे.

 

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने परबीर सिंह (Parambir Singh) यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना परमबीर यांनी ही धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. निलंबित (Suspended) पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित केली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते. या बैठकी दरम्यान वाझेच्या नियुक्तीसाठी अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती, असे सिंह यांनी ईडीला सांगितले.

वाझेला गुन्हे शाखेत पोस्टिंग देण्याची सूचना
सचिन वाझे याची पोलीस दलात पुनर्नियुक्ती केल्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत (Crime Branch) पोस्टिंग देण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. तसेच काही महत्त्वाची जबाबदारी देण्यास सांगितले होते. याशिवाय सचिन वाझेला सीआययूची (CIU) जबाबदारी देण्यात आली होती. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास सीआययू कडून केला जात होता. हा तपास वाझेकडे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितल्याचे परमबीर सिंह यांनी दिली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री थेट सचिन वाझेला बोलावून या महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती घेत होते.

 

अनिल परब आणि गृहमंत्र्यांकडून बदल्यांची यादी
मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात.
या समितीमध्ये पीएसआय (PSI) ते डीसीपी (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो.
मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली.
ही यादी स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकवेळा दिली होती.
त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर (OSD Ravi Whitkar) यांनीही अनेकदा दिली होती.
बदल्यांची यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती, अशी माहिती सिंह यांनी दिली.

 

Web Title :- Parambir Singh | reappointment of suspend officer sachin vaze due to presure from home minister and chief minister says parambeer singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kidney Health | किडनी निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी सांगितलेल्या टिप्स करा फॉलो

 

Maharashtra Weather | आगामी 3 दिवसात हिमालयात पावसासह हिमवृष्टीची शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान बद्दल

 

Aditya Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर