उपचारासाठी जात असलेल्या युवकानं अ‍ॅम्ब्युलन्समध्येच केलं नर्सचं ‘लैंगिक’ शोषण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या एका जखमी युवकाने नर्सचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. 25 वर्षीय नर्सने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. नर्स लिजी स्मिथनं सांगितलं की, “ती लंडनमधील एका जखमी युवकावर उपचार करत होती. यावेळी तिच्यासोबत आक्षेपार्ह हरकती केल्या गेल्या.”

नर्स म्हणाली, “अ‍ॅम्ब्युलन्समधून जाणाऱ्या सबेह शालमेरच्या चेहऱ्याला इजा झाली होती. मी त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर लगेचच माझ्यासोबत छेडछाड करण्यात आली.”

ही घटना जून 2019 मध्ये घडली होती. परंतु नर्सनं आता या घटनेचा खुलासा केला आहे. पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली होती. त्याला दंडही आकारण्यात आला होता. 5 वर्षांसाठी आरोपीचं नाव सेक्स ऑफेंडर रजिस्टरमध्येही दाखल करण्यात आलं होतं.

नर्सचं म्हणणं होतं की, मेडिकल स्टाफला अनेकदा अशा प्रकारच्या शोषणाला सामोरं जावं लागतं. याविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी मी माझं प्रकरणं सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. नर्स लिजी सांगते की, नाईट शिफ्टदरम्यान तर अनेकदा शोषणाच्या घटना होतात. ज्यांच्याकडे कामाचा हिस्सा म्हणून पाहिलं जातं.

ब्रिटनच्या जीएमबी (General, Municipal, Boilermakers) युनियनच्या मते 2013 ते 2018 दरम्यान अ‍ॅम्ब्युलन्स स्टाफ सोबत शारीरिक हिंसेच्या जवळपास 14,441 केसेस समोर आल्या आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like