पॅरिस करार ‘अयशस्वी’, आगामी 5 वर्षात पृथ्वीचं तापमान 1.5 डिग्री वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील काही नेत्यांनी पाच वर्षांपूर्वी तापमान वाढीची जी सीमा निश्चित केली होती, आता तापमान त्यापेक्षा अधिक वाढत आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्राने नुकत्यात दिलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. अहवालात सांगण्यात आलं आहे की, येणाऱ्या पाच वर्षात जगातील तापमान 1.5 डिग्री सेल्सियस वाढू शकतं. हे तापमान आत्तापर्यंत नोंदवल्या गेलेल्या तापमानापेक्षा अधिक असेल. याआधी 2018 मध्ये संयुक्त राष्ट्राने वाढत्या तापमान वाढीच्या धोक्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

संयुक्त राष्ट्र, जागतिक हवामान संघटना आणि इतर काही संस्थांकडून आलेल्या अहवालात म्हटलं आहे की 2015 मध्ये झालेल्या पॅरिस कराराचा काही विशेष फायदा झाला नाही.

या वर्षी डेथ व्हॅली नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणचे तापमान 54.4 डिग्री पर्यंत पोहचले होते आणि जगातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक असणाऱ्या सैबेरियाचे कमाल तापमान 38 डिग्री सेल्सियस होते.

अमेरिकेतील स्टेनफोर्ट युनिव्हर्सिटीच्या डिफेनबाउ नुसार, तापमानातील ही वाढ अनपेक्षित आहे आणि ही इतिहासातील उल्लेख करण्यात आलेल्या घटनांपेक्षा अधिक वाईट अनुभव निर्माण करू शकते. अमेरिकेच्या पश्चिम भागात आणि कॅलिफोर्नियामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहवालानुसार 19 व्या शतकाच्या शेवटच्या दशकाच्या तुलनेत जगातील तापमान 1.1 डिग्री सेल्सियसने वाढले आहे.

मागील पाच वर्षात वाढलेल्या तापमानासाठी लोकच जबाबदार आहेत. जागतिक हवामान विज्ञान संघटनेचे महासचिव पेट्री तलास यांच्या मते दार वर्षी जगातील तापमान 1.5 डिग्री सेल्सियसने वाढण्याचा धोका आहे. मानवाच्या कर्मामुळे निसर्ग देखील बदलत आहे. अशाने तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे.