पाथरी तालुक्यात वाळू ‘माफिया’ सक्रिय ! तहसील प्रशासनाचे साफ दुर्लक्ष ?

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व तस्करी करणारे वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. पाथरी तहसील प्रशासनाच्या हद्दीतील डाकू पिंपरी येथील नदीपात्रात पाणी असताना सुद्धा गुरुवार, शुक्रवार या दोन दिवस गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर,बोट द्वारे रेती उपसा केला जात होता. वरील माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर ग्रामस्थांनी दिली. नदी पात्रात होत असलेल्या वाळू उपसा संदर्भात कार्यवाही कधी होणार? फोनवरून संपर्क करून असे विचारले असता रात्री पर्यंत कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार कट्टे यांनी दिली. नदीपात्रात पाण्यातून ट्रॅक्टर बोटींग द्वारे रेती उपसा केला जात होता. तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे होते मात्र याकडे तहसील प्रशासनाने स्पष्ट दुर्लक्ष केले? तहसील प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह? निर्माण झाले आहे.

तहसीलदार सुभाष कट्टे यांनी पाथरी तहसील प्रशासनाचा कार्यभार सांभाळला तेव्हा पासून नदीपात्रातून रेती उसाच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. वाळू माफिया व तहसील प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे. पाथरी तहसील हद्दीतील डाकू पिंपरी येथील बेकायदेशीर व अवैधरित्या नदीपात्रातून काढण्यात आलेली वाळू बीड जिल्ह्यात नेली जात असल्याची ची माहिती समोर येत आहे. शुक्रवार शनिवार दोन दिवस महसूल प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी पाहणी केली काल शनिवार( 5 सप्टेंबर ) रोजी पंचनामा करून बेकायदेशीररित्या जमा केलेला वाळू साठा जप्त केला. विलंबाच्या या कार्यवाही ने वाळू माफिया चे नशीबच फळफळले. प्रशासनाच्या या भूमिकेला हलगर्जीपणा म्हणायचा का वाळूमाफिया ला अभय नेमका असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. तलाठी सचिन शिंदे व मंडळाधिकारी प्रकाश गोवंदे यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.