‘कोरोना’ काळात Paytm ची झाली चांदी ! रोज कमावले 10 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने शुक्रवारी सांगितलं 31 मार्चला समाप्त झालेल्या वित्तीय वर्षाच्या दरम्यान कंपनीचं उत्पन्न वाढून ते 3,629 कोटी (रोज जवळजवळ 10 कोटी रुपये) झालं आहे. कंपनीने सांगितलं की दरवर्षीच्या तुलनेत कंपनीच्या तोट्यात 40%ची कमी आली आहे. पेटीएमने सांगितलं त्यांच्या मर्चेन्ट पार्टनर्स साठी डिजिटल सेवेच्या निर्माणात मोठी गुंतवणूक करणार आहे. त्यांनी सांगितलं की, वित्तीय सेवा आणि विक्री उपकरणाच्या व्यवहारात मोठी वाढ झाली त्यामुळं मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंपनीच्या तोट्यात 40%ची कमी आली आहे.

भारतीयांना डिजिटल क्षेत्रात सशक्त बनवत आहेत

पेटीएमचे प्रेसिडेंट मधुर देवडा यांनी सांगितलं की आम्ही लाखो भारतीयांना डिजिटल वित्तीय सेवांमध्ये सशक्त बनवण्यासाठी काम करत आहोत. आमचा हा प्रयत्न भारतीयांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयोगी ठरेल. आमच्या प्रयत्नांचा फायदा ग्राहकांनी नक्की घेतला पाहिजे.

2022 पर्यंत कंपनीला अधिक मजबूत बनवणार

देवडा म्हणाले, आम्ही 2022 पर्यंत कंपनीला अधिक मजबूत करण्याचा विचार करत आहोत. त्यासोबतच पेटीएम एक प्रमुख वित्तीय सेवा देणारा प्लॅटफॉर्म बनण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काही वर्षांत पेटीएम पोस्टपेड, पेटीएम मनी आणि पेटीएम इंशोरन्स सर्व्हिसेसचा टर्नओव्हर वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका बाजवणार आहेत. कंपनीच्या मते आत्तापर्यंत दोन लाखापेक्षा अधिक युनिट्सला अँड्रॉइडवर आधारित पॉईंट ऑफ सेल डिव्हाइसची विक्री केली आहे. त्याशिवाय स्मॉल अँड मिडीयम इंटरप्रायजेस आणि ग्रॉसरी स्टोअर मधून पीओएस डिव्हाइसची मागणी मोठ्या प्रमाणात येत आहे.