‘कोरोना’ व्हायरस दरम्यान Paytm ने वापरकर्त्यांसाठी केली मोठी घोषणा ! आज एक लाखांपर्यंत करा खरेदी, पुढच्या महिन्यात द्या पैसे !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जर आपण पेटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण कंपनीने आपल्या पोस्टपेड सेवेचा विस्तार केला आहे. आता आपण आपल्या शेजारच्या जनरल स्टोअर आणि रिलायन्स फ्रेश, हल्दीराम, अपोलो फार्मसी, टाटा क्रोमा, शॉपर्स स्टॉपसहित इतर रिटेल चेन वरून वस्तू खरेदी केल्यास एका महिन्यासाठी पैसे न दिल्यास सूट मिळेल. वापरकर्ते त्यांची सर्व बिले भरण्यासोबतच किराणा सामान आणि घरातील उपयुक्त वस्तू खरेदी करण्यासाठी याचा वापर करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना साथीच्या काळात ग्राहकांच्या कर्जाची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता कंपनीने फर्निचर आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या मोठ्या वस्तूंसाठी मासिक पेमेंट मर्यादा वाढवून एक लाख रुपये केली आहे.

अशा प्रकारे घ्या पेटीएम पोस्टपेडचा फायदा –

पेटीएमने म्हंटले की, या सेवेमुळे पेटीएम वापरकर्त्यांना वाढीव कर्जाच्या मर्यादेमध्ये आराम मिळू शकेल. यासाठी दररोजचा खर्च भागविण्यासाठी पुन्हा पुन्हा पैसे काढण्याची गरज भासणार नाही. कंपनीने पोस्टपेडचे 3 प्रकार सादर केले आहेत. यामध्ये लाईट, डिलाईट आणि एलिटचा समावेश आहे. जेथे पोस्टपेड लाईटची सुविधा फीसह 20,000 रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी डिलिट आणि एलिट मासिक क्रेडिट लिमिट 20,000 रुपयांपासून ते 1 लाखांपर्यंत आहेत. यात कोणत्याही प्रकारची सुविधा फी नाही.

पेटीएम पोस्टपेड सेवेचा लाभ घेण्यासाठी फायनान्शिअल सर्व्हिस सेक्शनमध्ये ‘पोस्टपेड’ आयकॉन दिसून येईल. यासाठी पार्टनर एनबीएफसीसह ऑनलाइन केवायसी पूर्ण करावे लागेल. हे पूर्ण झाल्यानंतर आयकॉन दिसेल. हे बिल प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत परतफेड करण्याची आवश्यकता असेल. ही सेवा दोन एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्या) च्या भागीदारीत देण्यात येत आहे. हे पेटीएम अ‍ॅप वापरकर्त्यांना वेगवेगळ्या देयकासाठी इंस्टंस्ट क्रेडिट लाईन म्हणजेच त्वरित कर्ज सुविधा देते.