पदेशात वस्तू विक्रीसाठी Paytm नं सुरू केली ‘ही’ नवी सर्व्हिस, तुम्ही देखील त्याव्दारे करू शकता ‘भरघोस’ कमाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात तयार होणाऱ्या वस्तू परदेशात विकण्यासाठी पेटीएम मॉलने नवे पाऊल उचलले आहे. यासाठी पेटीएम मॉलची सहाय्यक कंपनी पेटीएम कॉमर्सने दक्षिण पूर्व आशिया, पश्चिम आशिया, अफ्रिका, अमेरिका सारख्या बाजारात भारतीय उत्पादनांसाठी अनेक संस्थांशी करार केला आहे. पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले की पेटीएम मॉलची सहाय्यक कंपनी पीडब्ल्यूसी एक टेंड्रिग हाऊस आहे आणि त्यांनी काही कंपन्यांसह करार केला आहे. ते म्हणाले की आम्ही व्यापार शोच्या माध्यमातून खरेदीरांच्या शोधात आहोत.

पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव मिश्रा म्हणाले की आम्ही भारतील उत्पादनांची परदेशात निर्यात करणार आहोत. आमचा प्रयत्न आहे की मेड इन इंडिया उत्पादनांच्या खरेदीवर जागतिक उपभोक्यांसाठी सर्वात मोठे माध्यम तयार करणे.

या वस्तुंना मिळणार परदेशी बाजार –
पेटीएम मॉल द्वारे भारतातील तांदूळ, मसाले, चहा, सुका मेवा, ताजे फळ आणि भाज्या, बाजरी, तेली जैविक खाद्य, डाळ या वस्तुंना बाजार मिळवून दिला जाईल.

व्यवसायिकांसाठी सुरु केले नवे तंत्रज्ञान –
पेटीएमने आपले नवे तंत्रज्ञान सुरु केले आहे जेणेकरुन व्यापाऱ्यांची सुविधा वाढवता येईल. कंपनीने ऑल इन वन पीओएस डिवाइस, क्यूआर, पेटीएम फॉर बिझनेस आणि पेटीएम बिझनेस खाते सादर केले आहे. कंपनीने सांगितले की पेटीएम मोठ्या आणि छोट्या उद्योगकांसाठी पेमेंट सुविधा देते. सध्या पेटीएम जवळपास 1 कोटी 60 लाख पार्टनर्सला जोडले गेले आहे.

बिजनेस अ‍ॅपसाठी पेटीएम –
हे अ‍ॅप छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी सोपा पर्याय आहे. याद्वारे डिजिटल पेमेंटला स्वीकारुन या अ‍ॅपच्या माध्यमातून बँक खाते, UPI अ‍ॅड्रेसेज आणि पेटीएम वॉलेटमध्ये बल्क पेमेंट आणि ट्रॅकिंग केली जाऊ शकते. याने B2B अ‍ॅण्ड B2C पद्धतीचे पेमेंट सोपे होईल. याद्वारे वेंडर्स, कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि रिवार्ड किंवा रिफंडचे पेमेंट केले जाऊ शकते.

पेटीएम बिजनेस खाते –
पेटीएम बिजनेस खाते पेटीएम फॉर बिजनेस अ‍ॅपमध्ये इंटीग्रेट करण्यात आले आहे. याद्वारे अनेक कामे करता येतील. जसे की पेमेंट सेटक करणे, ऑटोमेटेड रिमाइंडर्स सेट करणे आणि मोबाइलवर पेमेंट नोटिफिकेशन मिळवणे. पेटीएम बिजनेस खात्याद्वारे रिपोर्ट डाऊनलोड केले जाऊ शकते, डेली सेल्सला ट्रॅक केले जाऊ शकते आणि विना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय UPI किंवा वॉलेट द्वारे पेमेंट्स कलेक्ट केले जाऊ शकते.