PBCL | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार, दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेल्या पहिल्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारी पासून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PBCL | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित पहिल्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ (punit balan celebrity league) क्रिकेट स्पर्धेचे (PBCL) आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन (Punit Balan) म्हणाले की, मराठी चित्रपट सृष्टीतील एकापेक्षा एक दिग्गज आणि नामांकित दिग्दर्शक, कलाकार, सहाय्यक कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा समावेश असलेली ही या वर्षातील पहिलीच स्पर्धा ठरणार आहे. क्रिकेट आणि चित्रपट कलाकार यांचे नाते हे अतूट आहे. हे सर्वच कलाकार चित्रपट आणि इतर माध्यमांव्दारे आत्तापर्यंत नागरिकांचे मनोरंजन करत असतात. आता क्रिकेटच्या मैदानावर उतरून ते आपले कौशल्यपणाला लावणार आहेत. क्रिकेट, कलाकार आणि धमाल-मस्ती अशी अनोखी मेजवानी या स्पर्धेव्दारे सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. (PBCL)

ही स्पर्धा ६ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे होणार आहे. हे सर्व सामने दिवस-रात्री या कालावधीत होणार आहेत. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजक्त्व लाभले आहे. स्पर्धेत एकूण ४ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

रायगड रॉयल्स्, सिंहगड स्ट्रायकर्स, प्रतापगड वॉरीयर्स, शिवनेरी लायन्स्, तोरणा टायगर्स, पन्हाळा पँथर्स या ६ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. पांढर्‍या चेंडूवर होणार्‍या या स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहेत. महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, शरद केळकर, सिध्दार्थ जाधव, सुबोध भावे आणि प्रविण तरडे असे एकापेक्षा एक दिग्गज स्पर्धेत या संघांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघाला १,११,१११ रूपये आणि करंडक तर,
उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे.
या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि
क्षेत्ररक्षक यांना करंडक व ११ हजार रूपये (प्रत्येकी) देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

 

 

हे सर्व सामने करोना महामारी सुरक्षेचे नियम पाळून आयोजित करण्यात
येणार आहे. तसेच स्पर्धेचे सामने विनाप्रेक्षक खेळविण्यात येणार आहेत.
पण प्रेक्षकांना या सर्व सामन्यांचा आनंद ‘पुनित बालन स्डुडिओज्’ या ‘यु-ट्युब चॅनेल’
माध्यमाव्दारे घेता येणार आहे, असे पुनित बालन यांनी सांगितले.

Web Title :- PBCL | The first ‘Puneet Balan Celebrity League’ cricket tournament with the participation of Marathi film directors, superstars and veteran actors from January 6

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वाहन चोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 दुचाकी जप्त

Multibagger Stock | ‘या’ शेयरने एक महिन्यात दुप्पट केले पैसे ! गुंतवणुकदारांना मिळताहेत जबरदस्त रिटर्न

Ajit Pawar | ‘लस नाही तर प्रवेश नाही’, अजित पवारांचा पुण्यात मोठा निर्णय

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवुन 40 लाखाची फसवणुक; पुणे पोलिसांकडून दांपत्यास अटक