पुणेकरांनो सावधान ! public place वर फटाके फोडण्यावर बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनमार्ग आणि घशाचे विकार उद्भवून कोरोनाला (coronavirus) निमंत्रण मिळू शकते अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे फटाक्यांना बंदी घालण्याची मागणी पुढे आल्यानंतर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) सार्वजनिक ठिकाणांवर फटाके वाजविण्यावर( ban-playing-firecrackers-public-places) बंदी घातली आहे. यासोबतच खासगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कमी धुराचे आणि आवाज होणार नाही अशा फटाक्यांचा वापर करावा असे आदेशात नमुद केले आहे. बाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी काढले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला आहे. फटाके वाजविण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

1.) महापालिकेची उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे, शाळा आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच सर्व खाजगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा किंवा शक्यतो टाळावा.

2) कोविड -19 बाधित रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी कमी आवाजाचे (ध्वनी प्रदूषण न होणारे) तसेच कमी धूर होणा-या फटाक्यांचा वापर करावा.

3) नागरिकांनी कोविड विषयक योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. यामध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींग, साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावी.

4)कोरोना झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे.

5) सॅनिटायजर ज्वलनशील असल्याने दिवाळीचे दिवे लावताना तसेच फटाके फोडताना सॅनिटायजरचा वापर टाळावा.

6.) दिवाळी काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक / सांस्कृतिक / सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रमांना परवानगी नाही. केवळ ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

7) दिवाळीकरिता खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्या. व योग्य ती खबरदारी घ्यावी.

तसेच मास्क योग्य प्रकारे परिधान न करणे, रस्त्यावर धुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.