पत्नीला शोधताना मेहुण्यासोबत झाला वाद, अन् पतीने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील व्यक्तींना न सांगता निघून गेलेल्या पत्नीला शोधण्यासाठी पती आणि मेहुणा एकत्र बाहेर पडले. पत्नीला शोधत असताना या दोघांमध्ये वाद झाले अन् रागाच्या भरात पतीने मेहुण्याचा डोक्यात बांबूने मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.26) पुण्यातील अल्पबचत भवना समोरील क्वीन्स गार्डन मधील झाडीत रेल्वे पटरीच्या बाजूला घडली.

अक्षय दिनेश कुलकर्णी (रा. कोथरूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात संतोष मंचाराम चव्हाण (वय-25 मुळ रा. नागपूर सध्या दारुवाला पुल) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने खूनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण याची पत्नी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. त्यामुळे मेहुणा अक्षय आणि आरोपी संतोष हे दोघे तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडले. तिचा शोध घेत असताना दोघांचे याच कारणावर वाद झाले. यावेळी आरोपीने चव्हाण याने अक्षयला बांबूने बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध होऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चव्हाण याने अक्षयाचा मृतदेह तेथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली झाकून टाकला.

शुक्रवारी आरोपी संतोष चव्हाण याने पोलीस ठाण्यात हजर होऊन मेहुणा अक्षय कुलकर्णी याचा खून केल्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पोलिसांना मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like