पत्रकारानं विचारलं ‘मास्क’ का नाही लावला, त्यानं हल्ला करत हातच मोडला ‘रिपोर्टर’चा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – परळीतील धर्मापुरी रोडवरील स्थानिक सिमेंट कंपनीमध्ये कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी काही स्थानिक पत्रकार गेले होते. त्यावेळी पत्रकाराने एकाला मास्क का लावला नाही ? अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने संबंधिताने पत्रकारांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकार दत्तात्रय काळे आणि महादेव शिंदे अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

कोरोनाविषयी काय काळजी घेत आहात, मास्क का नाही लावला ? असे प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारणारे तुम्ही कोण असा सवाल विचारत अज्ञात व्यक्तींनी पत्रकारांवर हल्ला चढवला. हा प्रकार घडल्यानंतर परळी शहरातील संभाजी नगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याअन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पत्रकार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.