बुरे दिन ! सलग दुसर्‍या दिवशीही महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल डिझेलचे भाव सध्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. मंगळवारी वाढलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोल 74.61 रुपए लिटर इतके झाले आहे. गेल्या वर्षीपासूनचा हा सर्वात जास्तीची दर आहे. तसेच 67.49 रुपए प्रति लीटर इतका दर डिझेलचा आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात तीन टक्क्यांनी कच्च्या तेलात घसरण पहायला मिळाली. ब्रेंटच्या कच्च्या तेलाचे दर 60 डॉलर प्रति बॅरल पेक्षाही कमी झाले आहेत.

19 पैशांनी महाग झाले पेट्रोल –
मंगळवारी इंधन कंपन्यांनी आपल्या दरामध्ये अनेक बदल केल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 19 पैसे तसेच कोलकत्ता आणि मुंबईमध्ये 13 पैसे, चेन्नईमध्ये 14 पैसे प्रति लीटर ने वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळते. दिल्लीमध्ये 16 पैसे, कोलकात्यात 10 पैसे, मुंबईत 12 पैसे आणि चेन्नईमध्ये 11 पैसे लीटर दराने डिझेल महाग झाले आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइट नुसार, दिल्ली, कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोलचे दर वाढून क्रमश: 74.61 रुपए, 77.23 रुपए, 80.21 रुपए आणि 77.50 रुपए प्रति लीटर झाले आहेत. या चारही प्रमुख शहरांमध्ये डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे. क्रमश: 67.49 रुपए, 69.85 रुपए, 70.76 रुपए आणि 71.30 रुपए प्रति लीटर दर झाला आहे.

60 डॉलर प्रति बॅरल पेक्षाही कमी झाला दर –
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संबंधांमुळे चीनचा व्यापार जरा मंदावला आहे. मागील आर्थिक सत्रात ब्रेंट क्रूडचा दर 2.88 % घसरून 59.41 डॉलर प्रति बॅरलवर आला. या आधी तीन सप्टेंबरला ब्रेंट क्रूडचा दर 58.26 डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. मात्र तरीही मंगळवारी बाजारात वृद्धी पहायला मिळाली तरीसुद्धा 60 डॉलरच्या खालीच भाव राहिला.

Visit : policenama.com