सलग 6 व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात कमालीची वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेलक्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सैदी अरेबियाने 50 टक्के तेल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा सर्वात मोठे देश आहे. तेल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम जगातिक तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसून येत आहे. भारतामध्ये सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सामान्य जनतेला झटका बसला आहे.

रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील सहा दिवसांत दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 1.59 रुपयांनी तर डिझेलचे दर 1.31 रुपयांनी वाढले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दरात 27 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 21 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोलच्या दरामध्ये 24-31 पैसे प्रति लीटर वाढ झाली होती. तर डिझेलच्या दरामध्ये 24-26 प्रति लिटर वाढ झाली होती.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात क्रमश: 73.62 रुपये, 79.29 रुपये, 76.32 रुपये आणि 76.52 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. चारही महानगरांमध्ये डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. ही दरवाढ क्रमश: 66.74 रुपये, 70.01 रुपये, 69.15 रुपये आणि 70.56 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.

Visit :- policenama.com