Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग दुसर्‍या दिवशीही स्थिर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी (15 फेबुवारी ) स्थिरता दिसून आली. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोल 71.94 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 77.60 रुपये आणि कोलकातामध्ये 74.58 रुपये प्रति लीटर आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोल 74.73 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

डिझेलबाबत बोलायचे तर आज दिल्लीत डिझेल 65.23 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझले 68.36 रुपये आणि कोलकातामध्ये 67.59 रुपये प्रति लीटर आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईत आज डिझेल 68.89 रुपये प्रति लीटर आहे.

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलतात. पेट्रोलियम कंपन्या रोज सकाळी 6 वाजता नव्या किमती जारी करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये एक्साइज ड्यूटी, वॅट आणि डिलर कमिशन नसते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like