Petrol-Diesel Price 21 August : पेट्रोलच्या किमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी तेल कंपन्यांनी आज (21 ऑगस्ट) लागोपाठ 20व्या दिवशी डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही, परंतु पेट्रोलच्या किमतीत दिल्लीमध्ये 19 पैसे प्रति लीटरने वाढ केली आहे. पेट्रोलच्या किमतीत लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढ झाली आहे. यापूर्वी गुरूवारी पेट्रोलचे दर 10 पैसे प्रति लीटरने वाढवले होते.

19 पैशांच्या वाढीनंतर शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 81.19 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर मुंबईत 87.87 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर दिल्लीत डिझेल 73.56 रुपये प्रति लीटरने आणि मुंबईत 80.11 रूपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. जुलै महिन्यात सरकारी तेल कंपनीने डिझेलचे दर वाढवले होते. जुलैमध्ये तब्बल 10 वेळा हे दर वाढवण्यात आले होते.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई             87.87 – 80.11
पुणे              88.21 – 79.23
ठाणे              87.28 – 78.48
अहमदनगर    87.70 – 78.74
औरंगाबाद      88.34 – 79.35
धुळे               88.20 – 79.23
कोल्हापूर      88.33 – 79.37
नाशिक        88.21 – 79.23
रायगड         87.52 – 78.54

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. पेट्रोलच्या दरात शेवटी 29 जूनला बदल झाला होता. मागच्या आठवड्यात डिझेलचे दर 25 वेळा आणि पेट्रोलचे दर 21 वेळा वाढले आहेत. 7 जूनपासून आतापर्यंत पेट्रोल 9.17 रुपये आणि डिझेल 11.66 रुपयांनी महागले आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता