Petrol-Diesel Price 25 August : पेट्रोलचे दर 11 पैशांनी वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील डिझेलचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी तेल कंपन्यांनी आज (25 ऑगस्ट) लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली. आयओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर 24 व्या दिवशीही स्थिर आहे. सोमवारी पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढवले होते.

11 पैशांच्या वाढीनंतर मंगळवारी मुंबईत पेट्रोल 88.39 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेलचा दर 80.11 रूपये आहे. पेट्रोलच्या किमतीत लागोपाठ वाढ होताना दिसत आहे. मागील 10 दिवसात पेट्रोल 1.3 रुपये प्रति लीटरने महागले आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई           88.39 – 88.11
पुणे            88.47 – 79.06
ठाणे          87.88 – 78.48
अहमदनगर 88.21 – 78.74
औरंगाबाद 89.48 – 79.95
धुळे          88.27 – 78.90
कोल्हापूर 89.27 – 79.88
नाशिक     88.75 – 79.35
रायगड        88.10 – 78.69

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता