Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या नराधमाकडून भर रस्त्यात 17 वर्षाच्या मुलीशी अश्लील भाषा अन् ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने जाणार्‍या 17 वर्षाच्या मुलींचा पाठलाग करुन तिला अश्लिल बोलून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार कॅम्पमध्ये भर दिवसा घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) पॉल जेम्स स्वामीनाथन (वय 52, रा. महात्मा गांधी रोड, कॅम्प) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने लष्कर पोलिसांकडे फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी (गु. र. क्र.122/21) भादंवि 354 अ, 354 ड सह पोक्से अ‍ॅक्ट 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना कॅम्पमधील ओयो हॉटेलचे गल्लीत ताबुत स्ट्रीटवर 1 ऑक्टोंबर रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी ताबुत गल्लीतून जात असताना पॉल स्वामीनाथन तिच्यासमोर आला.
तिला आपल्याकडे बोलावून तिच्याशी अश्लिल बोलला. या प्रकाराने ही मुलगी घाबरुन घरी पळत जाऊ लागली.
तेव्हा त्याने अश्लिल भाषा वापरुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
म्हणून गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking! a 52-year-old man talk to 17-year-old girl on the street in wrong language, molestation case in lashkar police station in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Japanese Towel Exercise | 5 मिनिटांची ‘जपानी टॉवेल एक्सरसाईज’ केल्याने होतील फ्लॅट अ‍ॅब्ज, 10 दिवसात चमत्कार !

Power Crisis In India | देशात वीजेच्या संकटाचा धोका ! 72 थर्मल पावर प्लांटमधील कोळसा संपला, जाणून घ्या कारण

Multibagger Stocks | आश्चर्यकारक शेयर ! 1 लाख रुपयांचे केले 40 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर