खुशखबर ! बजेटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आज 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपले दुसरे बजेट सादर करतील. दरम्यान, हे बजेट सादर होण्यापूर्वीच सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 ते 8 पैशांची कपात करण्यात आली आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 9 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची कपात करण्यात आली.

चार शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे दर :
राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 73.19 रुपये असून त्याच वेळी, एक लिटर डिझेलसाठी किंमत 66.22 रुपये आहे . मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 78.83 रुपये प्रति लीटर, तसेच डिझेलची किंमत प्रति लिटर 69. 42 रुपये आहे. याशिवाय कोलकतामध्ये पेट्रोल 75.85 रुपये प्रति लीटर तर डिझेल 68.59 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 76.03 रुपयांवर आली आहे. याशिवाय डिझेलची किंमत प्रति लिटर 69.96 रुपये आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज निश्चित केल्या जातात. सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत लागू होते. त्यांच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

घर बसल्या चेक करा आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती:
– सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे दर तपासून पाहायचे असतील तर 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती मिळवू शकता.
– यासाठी तुम्हाला RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
– आपण दिल्लीत असाल आणि संदेशाद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ इच्छित असाल तर आपल्याला RSP 102072 लिहून 92249 92249 वर पाठवावे लागेल.

1 एप्रिलला पेट्रोल, डिझेल महागणार :
एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेल किंमती 50 पैशे ते एक रुपया लिटरपर्यंत वाढू शकतात. यामागील कारण म्हणजे देशात BS-6 उत्सर्जन मानक असणारे इंधनाचा उपयोग सुरु होणार आहे. सध्या BS-4 मानक इंधन देशात उपलब्ध होत आहे. ते युरो-स्टँडर्डस अनुरूप आहे. वाहनांमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारने 1 एप्रिलपासून BS-6 मानक इंधन वापरण्याचा निर्णय घेतला.