खुशखबर ! सलग 5 व्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात मोठी ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कच्च्या तेलाच्या किमतीत सोमवारी सकाळी मोठी घसरण झाली. क्रुड ऑईलचा दर सोमवारी ट्रेडिंग सुरू होताच सुमारे 30 टक्क्याने घसरला. क्रुड ऑईल वॉरमुळे या किमती घसरत असल्याचे म्हटले जात आहे. ओपेक प्लस तेलाच्या उत्पादनाच्या कमतरतेवर सुरू असलेली चर्चा निष्पळ ठरली आहे. तिकडे सौदी अरबने तेलाच्या किमतीत मोठी कपात केली आहे आणि पुढील महिन्यापासून उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा तेलातील घसरणीचा थेट परिणाम येत्या काही दिवसात भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर पडणार आहे. या कारणामुळेच सोमवारी देशातील मोठ्या महानगरात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी कपात झाली.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
पुणे 76.59 – 65.50
अहमदनगर 76.61 – 65.53
औरंगाबाद 76.56 – 65.49
धुळे 76.18 – 65.13
कोल्हापूर 76.67 – 65.61
नाशिक 76.81 – 65.72
रायगड 76.42 – 65.32

राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलमध्ये 24 पैशांची घसरण झाली, ज्यामुळे ते 70.59 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर, डिझेल 25 पैसे घसरणीमुळे 63.26 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल सोमवारी 23 पैशांनी घसरून 73.28 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेल येथे 25 पैसे घसरणीसह 65.59 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलचा दर 24 पैशांनी घसरल्याने 76.29 रुपये प्रति लीटरने पेट्रोलची विक्री होत आहे. येथे डिझेल 26 पैसे घसरणीसह 66.24 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 73.33 रुपये प्रति लीटरने डिझेल 26 पैसे स्वस्त होऊन 67.75 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.