तेल उत्पादनात कपात करणार OPEC देश ! आत्ताच फुल करा गाडीची टाकी, वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाईच्या झळा दिवसेंदिवस वाढतच आहेत असं दिसत आहे. कांद्याच्या दरात चढउतार सुरू आहेत. असे असतानाच आता पाम ऑईलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता खाद्यतेल महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या तेलउत्पादक देशांच्या समूहानं म्हणजेच ओपेकनं तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. OPECच्या सदस्यांच्या बैठकीत प्रतिदिन 5 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे ओपेकनं हा निर्णय घेतला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाला आहे. दरम्यान यामुळे आता दुहेरी महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेल होणार महाग
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, ओपेकच्या निर्णयानंतर कच्च्या तेलाचे दर 4 डॉलर प्रतिबॅलर वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात जर चढउतार झाला तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

अमेरिका उत्पादन वाढवणार
ओपेक देशांनी तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अमेरिकेने तेलाचं उत्पादन वाढवण्याच निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये हे उत्पादन वाढेल असं अमेरिकेने जाहीरदेखील केलं आहे. अशी स्थिती असल्यास मात्र कच्च्या तेलाच्या दरावर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.

Visit : Policenama.com