PF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे काढाल पैसे? जाणून घ्या सोपा मार्ग
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PF Account | भविष्य निर्वाह निधी (PF) या खातेधारकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पीएफ खातेधारकांना (PF Account ) तात्काळ पैशांची आवश्यकता असेल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामधुन खातेधारकांना 1 लाखांचा लाभ मिळणार आहे. यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही. भविष्य निर्वाह निधी संघटनामधून (EPFO) पगारदार लोकांना अॅडव्हान्स क्लेमअंतर्गत (Medical Advance Claim) हे पैसे काढण्याची सुविधा दिली जातेय. तर कसा मिळेल लाभ? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
जीवघेणा आजार झाल्यास, अनेक वेळा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, जेणेकरून रुग्णाचा जीव वाचू शकेल. अशा गंभीर स्थितीत रुग्णांचा खर्च भागवण्यासाठी अॅडव्हान्सची सुविधा देण्यात येत आहे. असं भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितलं आहे.
अट काय?
क्लेम करणार्या कर्मचार्याच्या रुग्णाला सरकारी/पब्लिक सेक्टर युनिट/CGHS पॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असल्यास त्याबाबत देखील चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच तुम्ही मेडिकल क्लेमसाठी अर्ज भरू शकता.
लाभ किती होणार?
याद्वारे 1 लाख रुपये अॅडव्हान्स काढू शकणार आहे. जर तुम्ही वर्किंग डेमध्ये अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहेत. हे पैसे थेट कर्मचार्यांच्या खात्यात अथवा हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. स्लिप 45 दिवसांत द्यावी लागेल रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे अंतिम बिल अॅडव्हान्स रकमेसह समायोजित करता येणार आहे. (PF Account)
कसे काढायचे पैसे?
– तुम्ही www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अॅडव्हान्स क्लेम करु शकता.
– याशिवाय unifiedportalmem.epfindia.gov.in वरूनही अॅडव्हान्स क्लेम करता येईल.
– येथे तुम्हाला Online Services वर क्लिक करावे लागेल.
– आता तुम्हाला क्लेम (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून पडताळणी करावी लागेल.
– आता तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करावे लागेल.
– ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल.
– आता तुम्हाला रक्कम टाकावी लागेल आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
– यानंतर तुमचा पत्ता तपशील भरा.
– Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
– यानंतर तुमचा क्लेम दाखल केला जाणार आहे.
Web Title :- PF Account | pf account holders can claim 1 lakh rupees from epfo in advance for Medical Advance Claim
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष
- Life Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’
- Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO)