EPFO च्या नियमांमध्ये बदल ! कोरोनाच्या उपचारासाठी सुद्धा PF मधून काढू शकता पैसे, जाणून घ्या डिटेल्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात उपचार करणे लोकांना परवडत नसल्याने अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत एम्प्लॉई प्रोव्हिंडंट फंड ऑर्गनायजेशन (ईपीएफओ) ने आता कर्मचार्यांची भविष्यासाठी राखून ठेवलेली पीएफची PF रक्कम काढण्यासाठी अटींमध्ये दुसर्यांदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना व्हायरस संसर्गाच्या उपचारासाठी पीएफचे पैसे काढता येऊ शकतात. या पूर्वी मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एक स्पेशल तरतूद केली होती, ज्याअंतर्गत ईपीएफ मेंबर्स पीएफच्या PF 70 टक्के किंवा तीन महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता काढू शकतात.
घर खरेदी करण्यासाठी सुद्धा काढू शकता पैसे
जर तुम्हाला घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, पण होम लोनचा जास्त व्याजदर आणि कठोर अटींमुळे निर्णय घेता येत नसेल तर पीएफ अकाऊंट उपयोगी पडू शकते. कुणीही पगारदार कर्मचारी आपल्या पीएफ अकाऊंटमधून घर खरेदी करण्यासाठी रक्कम काढू शकतो. याशिवाय ईपीएफओकडून ही सुविधा सुद्धा दिली जाते की, तुम्ही तुमच्या घराच्या खरेदीसाठी पीएफ खात्यातून 90 टक्केपर्यंतची रक्कम देऊ शकता. तसेच मासिक ईएमआय सुद्धा आपल्या पीएफ खात्याद्वारे देऊ शकता.
7 लाख रुपयांचा इन्शुरन्स
तुमचा पीएफ कापून जात असेल तर संघटनेकडून तुम्हाला लाईफ इन्श्युरन्स सुविधा सुद्धा दिली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंत जीवन विम्याची सुविधा देत आहे. ईपीएफओचे सर्व सदस्य सबस्क्रायबर इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (ईडीएलआय) अंतर्गत कव्हर होतात. या अंतर्गत ईपीएफओ धारकांना 7 लाख रुपयांपर्यंत विमा कव्हर मिळते.
दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले
‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी
‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’
Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी