अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया डोनाल्ड ट्रम्प यांचा असा ‘BOLD’ अवतार कधीच पाहिला नसेल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मेलानिया डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या बाहेर जन्माला आलेली दुसरी फर्स्ट लेडी आहे. परंतु अमेरिकेची नागरिकता घेणारी पहिली फर्स्ट लेडी आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या बद्दल कोणालाच जास्त माहिती नाही. त्यांनी अशी अनेक काम केली आहे जी तुम्ही विचारही करू शकत. सध्या मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कालच (सोमवार दि 24 फेब्रुवारी) ते भारतात आले आहेत. एका छोट्याशा देशातून मॉडेलच्या रुपातून पुढे येऊन सुपरपावर अमेरिकेची फर्स्ट लेडी बनण्यापर्यंतचा मेलानियाचा प्रवास खूपच रंजक आहे.

https://www.instagram.com/p/BrcsUxkB7fo/

मेलानिया यांचा जन्म 1970 मध्ये झाला आहे. 16 व्या वर्षीच त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्या स्लोवेनियाई मॉडेलही राहिल्या आहेत. मेलानिया डोनाल्ड ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहे. मेलानिया यांचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात.

https://www.instagram.com/p/B0JTeRLhMgP/

https://www.instagram.com/p/BzzEsXInWHV/

GQ मासिकासाठी मेलानिया यांनी अनेकदा हॉट फोटोशुट केलं आहे. मेलानिया आधी मॉडेल होत्या. त्यांना मोस्ट स्टायलिश फर्स्ट लेडी म्हणूनही ओळखलं जात. त्या खूपच बोल्ड आहेत. मेलानिया अशी पहिली फर्स्ट लेडी आहे ज्यांनी 2000 साली GQ या मासिकासाठी न्यूड फोटशुट केलं आहे. मेलानिया ट्रम्प यांनी एक आर्कीटेक्चर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

https://www.instagram.com/p/BAykJf-H-VC/

आर्कीटेक्चरनंतर मेलानिया यांनी आपला मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला. यातच त्यांनी करिअर केलं. तिनं अनेक ब्रँडसाठी काम केलं आहे. मेलानिया यांना अनेक भाषा येतात. यात स्लोवेनियन, फ्रेंच, जर्मन, इटालियन, इंग्लिश यांचा समावेश आहे. मेलानियानं आपली ज्वेलरीही लाँच केली आहे. 2013 मध्ये तिनं आपली स्किनकेअर लाईन सुरू केली.

1998 मध्ये न्यूयॉर्कच्या एका फॅशन वीक पार्टीत मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. तेव्हा ट्रम्प राजकारणात नव्हते तर रिअल इस्टेटमध्ये ते काम करत होते. फॅशन वीकदरम्यान टाईम्स स्क्वेअरच्या किट कॅट क्लबमध्ये पार्टी होती. इथेच ट्रम्प यांची नजर मेलानिया यांच्यावर पडली. तेव्हा ट्रम्प यांची दोन लग्न झाली होती. त्यांची दुसरी पत्नी मारला मॅपलपासून ते घटस्फोट घेणार होते. तेव्हा त्यांचं वय 52 वर्षे होतं तर मेलानियाचं वय 28 होतं. इथेच त्यांनी नंबर एक्सचेंज केले. भेटीच्या एका आठवड्यानंतरच दोघांची पहिली डेट सुरू झाली. त्या काळात मेलानिया आणि ट्रम्प यांचा रोमँस जोरात सुरू होता. त्यांची भेट चर्चेचा विषय बनू लागली होती.

5 वर्ष एकत्र राहिल्यानंतर ट्रम्प आणि मेलानिया विवाहबद्ध झाले. 2004 मध्ये त्यांनी साखरपुडा केला तर 2005 साली त्यांनी लग्न केलं. लग्नात त्यांनी जो गाऊन घातला होता तो बनवण्यासाठी तब्बल 1000 तास लागले होते.

रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी मेलानियाला 1.5 मिलियन डॉलरची डायमंड रींग घालत लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 2006 साली मेलानिया अमेरिकन नागरिक झाल्या आणि त्यांनी मुलाला जन्म दिला. दोघांच्या लग्नात बिल गेट्स आणि हिलेरी क्लिंटन यांनीही उपस्थिती दाखवली होती. ट्रम्प यांच्या मुलाचं नाव बॅनर ट्रम्प आहे.

https://www.instagram.com/p/BAykskvH-Vr/

2016 ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती झाले आणि मेलानिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी बनल्या. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर तब्बल 23 देशांचा दौरा केला आहे. मेलानिया आपल्या सौंदर्यासाठी खूपच फेमस आहेत. गुगलवर त्यांना मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातं.