अभिनेत्री जेनिफर लोपेझच्या ‘तसल्या’ फोटोंनी लावली सोशलवर ‘आग’ !

पोलीसनामा ऑनलाइन – हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) हिचे विधूच्या गाऊनमधील काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो म्हणजे तिचं प्रीवेडिंग शुट असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर 50 व्या वर्षी पुन्हा एकदा ती लग्नाची तयारी करत आहे असंही बोललं जात होतं. यानंतर पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंमुळं जेनिफर चर्चेत आली आहे. जेनिफर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. पुन्हा एकदा तिनं काही फोटोंमुळं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जेनिफर लोपेझनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची खास बात अशी की, या फोटोत तिचा प्रचंड बोल्ड अवतार पहायला मिळत आहे. चाहत्यांना पुन्हा तिच्या हॉटनेसची भुरळ पडली आहे. जेनिफरनं तिच्या या फोटोंनी सोशलवर अक्षरश: आग लावली आहे.

आपल्या फोटोंमुळं सोशल मीडीयावर गाजण्याची जेनिफर ही काही पहिलीच वेळ नाही. जेनिफरची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिचे फॉलोवर्स पाहिले तर तुमचेही डोळे फिरतील. जेनिफरचे इंस्टावर तब्बल 116 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. हेच कारण आहे की, जेनीनं एखादा फोटो शेअर करयाचा उशीर की, क्षणातच तो सोशलवर व्हायरल होताना दिसतो.

https://www.instagram.com/p/B1T20fGgn1X/

https://www.instagram.com/p/B04A4jlAamR/

https://www.instagram.com/p/B06HxDuggM8/

https://www.instagram.com/p/BypR9MlgWKQ/

https://www.instagram.com/p/BxLsZlggZlo/

https://www.instagram.com/p/Bsq6LJogNRM/

https://www.instagram.com/p/Bnz5vkLFU6i/