अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगरचे ‘हे’ 5 सौंदर्यवर्धक फायदे वाचल्यानंतर चकित व्हाल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगर त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतं. जेवण बनवताना चवीसाठीही याचा वापर केला जातो. आज आपण याचे सौंदर्यवर्धक फायदे आणि वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

1) फेस टोनर – एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा पाणी मिक्स करून याचा टोनरप्रमाणे वापर केला तर चेहऱ्याच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

2) सन टॅनिंगपासून सुटका – जर तुम्हाला सन टॅनिंगची समस्या असेल तर एका बाऊलमध्ये अॅप्पल साईडर व्हिनेगर आणि थंड पाणी सम प्रमाणात घ्या. टॅन झालेल्या स्किनवर लावा. यानं खूप फायदा मिळेल.

3) अ‍ॅक्ने – जर तुम्हाला अ‍ॅक्नेचा त्रास असेल तर पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. काही काळ ठेवल्यानंतर चेहरा धुवून टाका. अ‍ॅक्नेची समस्या दूर होईल.

4) पायांचा दुर्गंध – अनेकांना ही समस्या असते. उन्हाळ्यात याचा त्रास जास्त होतो. यासाठी एका बादलीत थंड पाणी घ्या. यात 2-3 चमचे अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगर टाका. या पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून बसा. यानं खूप फायदा होईल.

5) हेअर क्लिंजर – एक कप पाण्यात 2-3 चमचे अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगर टाका. हे मिश्रण शॅम्पू केल्यानंतर केसांना कापसाच्या मदतीनं लावा. काही वेळ ठेवल्यानंतर केस थंड पाण्यानं धुवून टाका.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची त्वचा आणि केस वेगळे असतात. त्यामुळं काही पदार्थ काहींच्या त्वचेला किंवा केसांना सूट करतात तर काहींना नाही.